'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 09:26 AM2020-05-16T09:26:56+5:302020-05-16T09:40:48+5:30

नौदलातील एका पायलटने आपल्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी पाठवलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे.

letter written about the marriage of a navy pilot went viral on social media SSS | 'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल

'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल

Next

नवी दिल्ली - लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट. काही जण अत्यंत साध्या पद्धतीने तर काही धुमधडाक्यात लग्न करतात. आपलं लग्न हे स्पेशल आणि हटके कसं होईल याकडे अनेकांचा कल असतो. नौदलातील एका पायलटने आपल्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी पाठवलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं आहे. 'मला गोळी खाण्याची परवानगी द्या' असं म्हणत त्याने अनोख्या अंदाजात लग्नासाठी सुट्टी मागितली आहे. सध्या त्याचं हे पत्र खूपच व्हायरल झालं आहे. 

नौदलातील एका पायलटने आपल्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी वरिष्ठांना एक पत्र लिहीलं आहे. या पत्रात मला गोळी खाण्याची परवानगी द्या असं म्हटलं होतं. तर त्याच्या या पत्राला उत्तर देताना अधिकाऱ्यानेही नरकामध्ये स्वागत असं म्हटलं आहे. त्यांचा हा संवाद सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. गोव्यात भारतीय नौदलात लेफ्टनंट असलेल्या निशांत सिंहने आयएनएएस 300 च्या उच्च अधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलं होतं. निशांतने 9 मे ला लिहिलेल्या पत्रात लग्न करणार असल्याची माहिती दिली.

'इतक्या कमी वेळात हा बॉम्ब तुमच्यावर डागण्याचं दु:ख आहे पण तुम्हीही यासाठी परवानगी द्याल. मी स्वत:वर एक अणुबॉम्ब टाकायला जात आहे आणि मला वाटतं की युद्धाच्या काळात जशी परिस्थिती पाहून आपण तात्काळ निर्णय घेतो तसंच सध्याच्या परिस्थितीला पाहून मी दुसऱ्यांदा विचार करू शकत नाही. वरील विषयाबाबत मी अधिकृतपणे अत्यंत शांत डोक्याने बलिदान करण्यासाठी तुमच्याकडून मंजुरी मागतो. पूर्णपणे कर्तव्याच्या रेषेबाहेर आणि वैवाहिक जीवनाच्या या कब्रस्तानात मी इतर शूर पुरुषांचा साथी होऊ इच्छितो' असं निशांतने आपल्या पत्रात म्हटलं आहे. 

निशांतने  वरिष्ठ अधिकाऱ्याला लग्नाचं निमंत्रण देताना 'मी वचन देतो की ड्युटीवर पुन्हा कधी असं काही करणार नाही. किंवा आपल्या प्रशिक्षणासाठी आलेल्या पायलटना असं काही शिकवणार नाही' असं देखील म्हटलं आहे. लग्नासाठी निमंत्रण देताना असं पत्र लिहिल्यानंतर त्याला वरिष्ठांकडून उत्तरही तशाच पद्धतीचं मिळालं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर त्याला लाल अक्षरात पत्र पाठवलं आहे. 'तुझ्या सुरुवातीच्या काळात मी तुझा प्रशिक्षक होतो. एसीपी म्हणून तुम्हाला मिग विमानाचे उड्डाण करताना पाहणं माझ्यासाठी अभिमानास्पद होतं. तुझ्यातला उत्साह पाहिला. मला माहिती होतं की तू वेगळा आहेस. पण चांगल्या गोष्टींचा शेवट होतो. आता नरकात तुझं स्वागत आहे' असं वरिष्ठांनी म्हटलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया

CoronaVirus News : सरकारने मागवले 'हे' खास मशीन, आता 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट

CoronaVirus News : ... म्हणून कोरोनाला रोखण्यात 'हे' 18 देश ठरले यशस्वी

CoronaVirus News : '...म्हणून भारताची भूमिका महत्त्वाची'; मोदींसोबतच्या चर्चेनंतर बिल गेट्स यांचं ट्विट

प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी

CoronaVirus News : अमेरिकेने केला चीनवर गंभीर आरोप; सांगितलं कोरोना पसरण्यामागचं कारण

Web Title: letter written about the marriage of a navy pilot went viral on social media SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.