CoronaVirus News : सरकारने मागवले 'हे' खास मशीन, आता 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 03:05 PM2020-05-15T15:05:05+5:302020-05-15T15:24:36+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील 504 सरकारी आणि खासगी लॅबमध्ये ही टेस्ट केली जात आहे. कमी वेळेत जास्त टेस्ट करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर गेला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 3967 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 100 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 81,970 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे देशात 2649 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 51401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 27920 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी योग्य ती खबरदरी घेण्यात येत आहे. देशात आतापर्यंत 20 लाख नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. दररोज जवळपास 1 लाख सँपलची टेस्ट करण्यात येत आहे.

देशातील 504 सरकारी आणि खासगी लॅबमध्ये ही टेस्ट केली जात आहे. कमी वेळेत जास्त टेस्ट करण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.

सरकारने COBAS 6800 मशीन मागवले आहे. या मशीनच्या मदतीने आता जास्त कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट करता येणार आहेत.

लवकर कोरोना टेस्ट करणारे भारतात दाखल झालेले हे पहिले अत्याधुनिक मशीन आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी गुरुवारी हे मशीन नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलकडे (NCDC) सुपूर्द केले.

मशीन रोबोटिक्सने परिपूर्ण आहे. त्यामुळे हेल्थकेअर वर्कर्सला इन्फेक्शनची धोका निर्माण होणार नाही.

मशीनमुळे वेळेची मोठी बचत होणार असल्याची माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली आहे.

COBAS 6800 मशीनला टेस्टिंगसाठी न्यूनतम BSL2 आणि नियंत्रण लेव्हलच्या लॅबची आवश्यकता असते. मशीन कोणत्याही फॅसिलिटीवर ठेवता येत नाही.

COBAS 6800 व्हायरल हेपेटाइटिस बी अँड सी, एचआयव्ही, एमटीबी, पॅपिलोमा, सीएमव्ही, क्लॅमायडिया आणि नेयसेरेमिया सारख्या आजारांचीही टेस्ट करते.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक देश हे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ती 45 लाखांच्या वर गेली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 303,405 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे देशातील परिस्थितीही चिंताजनक होत आहे.

कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढली असून कोरोनाग्रस्तांचा आकडा 81 हजारांवर गेला आहे.