शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

coronavirus: या देशात सरकारचा क्वारेंटाइन प्रोग्रॅमच बनला जीवघेणा, ७०० हून अधिक जणांचा मृत्यू

By बाळकृष्ण परब | Published: September 28, 2020 5:53 PM

कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने बनवलेला क्वारेंटाइन प्रोग्रॅमच भयानक संटक ठरला आहे. आता या संदर्भात तपास सुरू झाला आहे.

ठळक मुद्देऑस्ट्रेलियामधील हा क्वरेंटाइन प्रोग्रॅम ७६८ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहेक्वारेंटाइन प्रोग्रॅममधील गंभीर त्रुटींमुळे सुमारे १८ हजार जणांना संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहेअव्यवस्था असलेल्या हॉटेल क्वारेंटाइनमुळे मे महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाला

मेलबर्न - कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी जगातील काही देशांचं कौतुक होत आहे. मात्र काही देशांच्या नाकर्तेपणावर टीका होत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने बनवलेला क्वारेंटाइन प्रोग्रॅमच भयानक संटक ठरला आहे. आता या संदर्भात तपास सुरू झाला आहे. या सनावणीदरम्यान ,हा क्वरेंटाइन प्रोग्रॅम ७६८ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच क्वारेंटाइन प्रोग्रॅममधील गंभीर त्रुटींमुळे सुमारे १८ हजार जणांना संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे.डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार हॉटेलमध्ये सुरू करण्यात आलेल्या क्वारेंटाइन प्रोग्रॅमचा मूळ हेतू पूर्ण होऊ शकलेला नाही. यामध्ये काही समस्या दिसून आल्या आहेत. त्या म्हणजे प्रोटेक्टिव्ह गिअरचा योग्य वापर केला गेला नाही. स्टाफला योग्य प्रकारे प्रशिक्षण दिलं गेलं नाही. सोशल डिस्टंसिंगचं पूर्णपणे पालन करण्यात आलं नाही.क्वारेंटाइन प्रोग्रॅम हा कथितपणे संकट बनल्याने ऑस्ट्रेलियामधील विरोधी पक्षनेते मायकल ओ्ब्रायन यांनी व्हिक्टोरियाचे प्रीमियर डेनियल मायकल अँड्र्यूज यांना राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. हॉटेलच्या क्वारेंटाइन प्रोग्रॅममुळे मेलबर्नमध्ये कोरोनाची दुसरील लाट आल्याचा आरोप केला जात आहे.विरोधी पक्षनेते मायकल ओब्रायन यांनी सांगितले की, व्हिक्टोरियाच्या पब्लिक अ‍ॅ़डमिनिस्ट्रेशनच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चूक आहे. त्यांनी सांगितले की, मृत्यू आणि अन्य नुकसानीचा काही अर्थ असेल तर त्यासाठी जबाबदार व्यक्तींनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. तसेच तपास समितीसमोर हजर झालेले वकील बेन इहले यांनी सांगितले की, सरकारने सिस्टिम घाईगडबडीत तयार केला आणि त्यावर देखरेख ठेवण्यात अपयशी ठरले.यापूर्वी आरोग्यमंत्री जेन्नी मिकाकोस यांनी शनिवारी राजीनामा दिला होता. त्यांनाच क्वारेंटाइन प्रोग्रॅमसाठी जबाबदार ठरवले जात आहे. अव्यवस्था असलेल्या हॉटेल क्वारेंटाइनमुळे मे महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा फैलाव झाला. तसेच या भागातील ९० टक्के बाधितांचा संबंध हा क्वारेंटाइन प्रोग्रॅ्मशी कथितपणे होता, असे सांगण्यात येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAustraliaआॅस्ट्रेलियाHealthआरोग्यInternationalआंतरराष्ट्रीय