CoronaVaccine : आरोपांकडे दुर्लक्षकरत रशियाने सुरू केले कोरोना लसीचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 05:41 PM2020-08-15T17:41:59+5:302020-08-15T17:45:19+5:30

रशियन आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की ही लस आवश्यक त्या सर्व परीक्षणांतून गेली आहे. तसेच कोरोनाविरोधात रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यास यशस्वी ठरली आहे.

CoronaVaccinerussia begins production of coronavirus vaccine sputnik v not bothered by criticism | CoronaVaccine : आरोपांकडे दुर्लक्षकरत रशियाने सुरू केले कोरोना लसीचे उत्पादन

CoronaVaccine : आरोपांकडे दुर्लक्षकरत रशियाने सुरू केले कोरोना लसीचे उत्पादन

Next
ठळक मुद्देरशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की ते पुढील 12 महिन्यांत कोरोना लसीचे 50 कोटी डोस तयार करण्यास सक्षम आहेत.या लसीची 76 लोकांवर वेगवेगळी टेस्‍ट करण्यात आली आहे. WHO ने मागवली रशियन लसीची संपूर्ण माहिती.

मॉस्‍को - जागतीक आरोग्य संघटना आणि अमेरिकेसह पश्चिमेकडील काही देशांनी केलेल्या टीकेकडे दुर्लक्ष करत रशियाने आपल्या 'स्‍पूतनिक' कोरोना लसीचे उत्पादन सुरू केले आहे. यासंदर्भात रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी माहिती दिली. मंत्रालयाने सांगितले, की गमलेया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या या लसीचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की ते पुढील 12 महिन्यांत कोरोना लसीचे 50 कोटी डोस तयार करण्यास सक्षम आहेत.

रशियन आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की ही लस आवश्यक त्या सर्व परीक्षणांतून गेली आहे. तसेच कोरोनाविरोधात रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यास यशस्वी ठरली आहे. ही लस दोन वेळा टोचली जाते. तसेच ती व्हायरसविरोधात साधारणपणे दोन वर्षांसाठी रोग प्रतिकारशक्ती विकसित करेल. या लसीची 76 लोकांवर वेगवेगळी टेस्‍ट करण्यात आली आहे. 

रशियन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की या लसीचे उत्पादन लवकरच परदेशातही सुरू होईल. तसेच तिचे यूएई आणि फिलिपाइन्‍समध्ये ट्रायलही सुरू होत आहे. मात्र, ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, रशियन लस कितपत प्रभावी आणि सुरक्षित असेल याची तपासणी करण्यात आलेली नाही. याशिवाय या लसीचे साईड इफेक्टदेखील दिसून आले आहेत.  राष्ट्रपती पुतिन यांनी स्वतः म्हटले होते, की त्यांच्या मुलीलाही ही लस टोचण्यात आली आहे.

WHO ने मागवली रशियन लसीची संपूर्ण माहिती - 
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, केवळ 38 स्वयंसेवकांनाच ही लस देण्यात आली आहे. लस दिल्यानंतर त्यांच्यात 144 प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसून आल्याचा दावाही वृत्तपत्रने केला आहे. एवढेच नाही, तर परीक्षणाच्या 42 व्या दिवसापर्यंत 31 स्वयंसेवकांत साईड इपेक्ट्स दिसून येत आहेत, असेही वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र, जगभरातून प्रश्न उपस्थित होत असतानाच, आमची कोरोनालास पूर्णपणे सुरक्षित असून 20 देशांनी लसीसाठी ऑर्डरदेखील दिली असल्याचे रशियाने म्हटले आहे. याशिवाय, रशियन वृत्तसंस्था फोटांकाने दावा केला आहे, की स्वयंसेवकांच्या शरिरात दिसून येणाऱ्या साइड इफेक्ट्सची यादी मोठी आहे.

रशियाने कोरोना लसीवर जगातील अनेक देशांनी शंका उपस्थित केली आहे. याशिवाय जागतीक आरोग्य संस्थेनेही रशियाकडे लसीसंदर्भात माहिती मागितली आहे. एवढेच नाही, तर रशियन सरकारने लसीसंदर्भात केलेले संशोधन जारी करावे, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. जगभरात लसीवर संशोधन करणाऱ्या कंपन्या सातत्याने डेटा जाहीर करत आहेत आणि यासंदर्भात WHO ला माहिती देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

लाल किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी तैनात होते अँटी ड्रोन सिस्टिम, विशेष व्यवस्थेसह झाले पंतप्रधान मोदींचे भाषण

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

Web Title: CoronaVaccinerussia begins production of coronavirus vaccine sputnik v not bothered by criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.