corona virus first death in pakistan lahore | पाकिस्तानात कोरोनाचा पहिला बळी, संसर्गग्रस्तांचा आकडा 184 वर

पाकिस्तानात कोरोनाचा पहिला बळी, संसर्गग्रस्तांचा आकडा 184 वर

ठळक मुद्देहफीजाबाद येथील रहिवासी होता मृत इम्रानपाकिस्तानात 24 तासांत तब्बल 130 हून अधिक जणांना कोरोनाची लागण पाकिस्तानात कोरोना संसर्ग झालेल्यांचा आकडा 184 वर

इस्लामाबाद - आता यूरोप बरोबरच आशिया खंडातही कोरोना व्हायरसने पाय पसरायला सुरुवात केली आहे. आज पाकिस्तानातकोरोना व्हायरसने पहिला बळी घेतल्याची नोंद झाली. कोरोनामुळे पाकिस्तानच्या लाहौरमध्ये मंगळवारी सकाळी इम्रान नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तो हफीजाबाद येथील रहिवासी होता. पाकिस्तानात अचानकपणे कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे.

इम्रानला सोमवारी रात्री लाहोरमधील मायो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होते. मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले, अशी माहिती रुग्णालयातील सुत्रांनी दिली. पाकिस्तानात गेल्या 24 तासांत तब्बल 130 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात भीतीचे वातावरण असून कोरोना संसर्ग झालेल्यांचा आकडा 184 वर पोहोचला आहे.


पाकिस्तानात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो ईरानमधून आला होता. तो 14 दिवस सीमा भागातच देखरेखित होता. मात्र लाहोरमधील मायो रुगणालयात त्याचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील सिंद्धप्रांताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे एकून 155 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

करोनाचा सामना करण्यास इम्रान सरकार अपयशी ठरल्याने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. करोनाची लागण झालेले बरेच रुग्ण इराणमधून आलेले आहेत. 

सिंद्धमध्ये 150 जमांना कोरोनाची लागण - 
पाकिस्‍तानातील परिस्थिती इम्रान खान यांच्य दाव्यांपेक्षा पूर्ण पणे भिंन्न आहे. येथील सिंध प्रांत हा कोरोनाचा गड बनत चालला आहे. येथे सर्वाधिक 150 जमांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय खैबर पख्‍तूनख्‍वामध्ये 15, बलुचिस्‍तानमध्ये 10, पंजाबमध्ये 2, राजधानी इस्‍लामाबादमध्ये 2, तर गिलगिट-बाल्टिस्‍तानमध्ये कोरोचाचे 5 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्‍तानात गेल्या 24 तासांत कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या तीनपट वाढली आहे. यातील तब्बल 115 रुग्ण एकट्या सिंध प्रांतात आढळले आहेत.

कोरोनामुळे दोन डॉक्टकही संक्रमित -
सिंध प्रांताचे मुख्‍यमंत्री मुराद अली यांनी जनतेला शांततेचे आव्हान केले आहे. पाकिस्‍तानची आर्थिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या कराचीत कोरोनाचे 30 रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानात कोरोना ग्रस्तांवर उपचार करणारे डॉक्टरही सुरक्षित नाहीयेत. येथे दोन डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

Web Title: corona virus first death in pakistan lahore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.