शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

माकडाच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचला कोरोना व्हायरस; मात्र लस देताच झाला चमत्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 06:43 IST

कोरोनाची लस शोधण्यात चीनला यश आल्याचे वृत्त आहे. चीनमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या ही माहितीनुसार या लसीची चाचणी माकडांवर करण्यात आली.

बीजिंग : कोरोनाची लस शोधण्यात चीनला यश आल्याचे वृत्त आहे. चीनमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या ही माहितीनुसार या लसीची चाचणी माकडांवर करण्यात आली. माकडांमध्ये आधी कोरोनाचे विषाणू माकडांमध्ये सोडण्यात आले. तीन दिवसांनी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांना ही लस देण्यात आली. या लसीमुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्तीत वाढल्याचे आढळून आले आहे.माकडांमध्ये कोरोनाचे विषाणू सोडल्यानंतर सातव्या दिवशी एका माकडाच्या शरीरात ते पसरू लागले. त्याच्या फुफ्फुसापासून विविध भागांत हे विषाणू पसरले. मात्र, लस देण्यात आल्यानंतर प्रकृतीत सुधारणा दिसली असल्याचे प्रा. किन चुआन यांनी सांगितले. एक महिन्यानंतर काही माकडांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होऊन ते विषाणुमुक्त झाले. त्यांची चाचणीही निगेटिव्ह आली आणि शरीरातील सर्व अवयव नीट काम करीत असल्याचे आढळले.प्रकृतीत सुधारणा झालेल्यापैकी दोन माकडांच्या शरीरात एका महिन्याने तोंडाद्वारे पुन्हा विषाणू सोडण्यात आले. त्यांना ताप आला, मात्र कोरोनाची अन्य कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. दोन आठवड्यांनी त्यांची आॅटोप्सी झाली. त्यातही विषाणूही आढळला नाही. त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा हा परिणाम होता, असे या दैनिकाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)आत्मविश्वास वाढला : कोरोनावरील लस अद्याप मानवांना देण्यात आली नसली तरी माकडांवर झालेला प्रयोग यशस्वी झाल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. संशोधनातील हे यश खूप महत्त्वाचे आहे, असे प्रा. चुआन यांनी म्हणाले. ही लस कोरोनाचा संसर्ग झालेल्या माणसांनासाठी उपयोगी पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अमेरिका, फ्रान्समध्येही संशोधन : अमेरिका, चीन व फ्रान्समधील शास्त्रज्ञ कोरोनावर उपचार शोधत असून, अमेरिकेत सोमवारी एका युवकाला लस टोचण्यात आली. तिथे एकूण ४५ युवकांवर हा प्रयोग करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनUnited Statesअमेरिका