शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
5
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
6
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
7
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
8
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
9
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
10
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
11
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
12
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
13
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
14
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
15
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
16
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
17
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
18
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
19
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
20
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
Daily Top 2Weekly Top 5

हाँगकाँगमधील वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 04:14 IST

लॅरी कॅम यांची घोषणा : तीन महिन्यांपासूनचा संघर्ष सफल

हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये तीन महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक (एक्स्ट्राडिशन बिल) मागे घेतले जाणार आहे. हे विधेयक मागे घेण्यात यावे आणि लोकशाहीची स्थापना करावी या मागणीसाठी मेळावे व मोर्चे निघत होते. अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली होती. हाँगकाँग शहराच्या कार्यकारी प्रमुख कॅरी लॅम यांनी बुधवारी ही घोषणा केली. लोकशाहीची मागणी करणाऱ्या निदर्शकांच्या पाच महत्त्वाच्या मागण्यांपैकी एक मागणी अशा रीतीने मान्य झाली आहे.

गेल्या जून महिन्यापासून दशलक्षावधी लोक हे प्रत्यार्पण विधेयक मागे घेण्याची व लोकशाहीची मागणी करीत हाँगकाँगच्या रस्त्यांवर उतरले होते. हे आंदोलन सातत्याने सुरू होते.१९९७ मध्ये ब्रिटिशांनी हाँगकाँगचे हस्तांतर चीनकडे केले तेव्हापासून चीनच्या सत्तेला मिळालेले हे सगळ्यात मोठे आव्हान आहे. हाँगकाँगला निम-स्वायत्ततेचा दर्जा आहे. अखेर मागणी मान्यआंदोलन सुरू झाल्यापासून हे विधेयक मागे घेण्यास नकार दिलेल्या कॅरी लॅम यांनी शेवटी ती मागणी मान्य केली व शांतता राखण्याचे आवाहन केले. या विधेयकाचा हेतू हा संशयित गुन्हेगारांना चीनच्या हवाली करण्याचा होता. लोकांना वाटणारी काळजी दूर करण्यासाठी सरकार ते विधेयक पूर्णपणे मागे घेणार असल्याचे लॅम यांनी त्यांच्या कार्यालयातून व्हिडिओद्वारे केलेल्या निवेदनात म्हटले.