शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये पुन्हा कम्युनिस्ट पंतप्रधान

By admin | Updated: October 11, 2015 23:26 IST

नव्या घटनेवर एकमत न झाल्यामुळे संसद सदस्यांच्या घेतलेल्या मतदानात नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांचा पराभव झाला आहे.

काठमांडू : नव्या घटनेवर एकमत न झाल्यामुळे संसद सदस्यांच्या घेतलेल्या मतदानात नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांचा पराभव झाला आहे. नेपाळमधील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते के. पी. शर्मा ओली यांनी कोईराला यांचा पराभव केला आहे.संसदेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सीपीएन यूएमएल या पक्षाचे ते अध्यक्ष असून, त्यांना ३३८ सदस्यांचे पाठबळ मिळविण्यात यश आले. पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक २९९ संख्येपेक्षा त्यांना ३९ मते अधिक मिळाली, तर मावळते पंतप्रधान सुशील कोईराला यांना केवळ २४९ मते मिळाली. या मतदानात सर्व सदस्यांना सहभाग घेण्याची नियमानुसार सक्ती करण्यात आली होती. शर्मा ओली यांना यूसीपीएन माओवादी, राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी-नेपाळ, मधेशी जनाधिकार फोरम - डेमोक्रॅटिक या पक्षांची मदत मिळाली. मतदानानंतर संसदेचे सभापती सुभाषचंद्र नेबांग यांनी निकाल जाहीर केला.नेपाळने तयार केलेल्या नव्या राज्यघटनेस मधेशी लोकांनी विरोध केला असून, भारत-नेपाळ सीमेवर अजूनही तणावाचे वातावरण कायम आहे. भारतातून नेपाळमध्ये जाणाऱ्या धान्य, इंधनाची वाहतूक गेले अनेक दिवस खोळंबलेली आहे.के.पी. शर्मा ओली हे नेपाळमधील एक ज्येष्ठ माओवादी नेते म्हणून ओळखले जातात. १९६६ पासून ते राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. ६३ वर्षांचे ओली वर्षभरापूर्वी त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदी निवडले गेले. त्यापूर्वी त्यांनी पक्षातील जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. २००६ साली गिरिजाप्रसाद कोईराला यांच्या सरकारमध्ये ते उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री पदावर कार्यरत होते.ओली यांना नेपाळचे माओवादी नेते पुष्पकमल दहल यांनी पाठिंबा देताना, राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ओली यांची निवड होणे जवळजवळ पक्के झाले होते.