शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

कंगाल पाकिस्तानवर युद्धाचे ढग, नव्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता; विश्लेषकांच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 18:14 IST

गेल्या काही महिन्यांपासून अफगानिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने अफगाणिस्तानचे दहशतवादी हल्ले करत आहेत. जे पाकिस्तानने भारतासोबत केले तेच आता त्यांच्यासोबत होऊ लागले आहे.

गेल्या काही दशकांत सतत भारताशी युद्ध करून सतत हरणाऱ्या पाकिस्तानवर नव्या युद्धाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताविरोधात दहशतवादाला पोसून आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला त्यांनीच पाळलेला अस्तनीतला साप डसू लागला आहे. अमेरिकेला या सापाचे तोंड ठेचता आले नाही त्याला संपविण्यासाठी पाकिस्तान युद्ध पुकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

गेल्या काही महिन्यांपासून अफगानिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर सातत्याने अफगाणिस्तानचे दहशतवादी हल्ले करत आहेत. जे पाकिस्तानने भारतासोबत केले तेच आता त्यांच्यासोबत होऊ लागले आहे. अफगानिस्तानचे दहशतवादी पाकिस्तानचे एकामागोमाग एक लचके तोडू लागले आहेत. यामुळे पाकिस्तानला आता तालिबानशी युद्ध करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पाकिस्तानने अमेरिका अफगानिस्तान सोडून जात असताना तालिबानी दहशतवाद्यांना शरण दिली होती, ट्रेन केले होते आणि त्यांना पुन्हा अफगानिस्तानमध्ये घुसविले होते.

अफगानिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आता हेच दहशतवादी पुन्हा पाकिस्तान सीमेवर आले आहेत.  पाकिस्तानचे पत्रकार आणि विश्लेषक सुहेल वराइच यांनी पाकिस्तान एका नव्या युद्धाच्या दिशेने जात असल्याचे म्हटले आहे. याचा भौगोलिक आणि राजनितीक परिणाम होणार असल्याचाही त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. 

पाकिस्तानचा इतिहास हा युद्ध आणि संघर्षांनी भरलेला आहे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने सहा युद्ध लढली आहेत. तसेच अनेक सीक्रेट युद्धांत सहभागी झाला आहे. पाकिस्तानच्या सीमा या भारत, अफगानिस्तान, इराण आणि चीनला लागून आहेत. चीन सोडला तर उर्वरित सर्व देशांसोबत काही ना काही वाद सुरु आहेत. भारताविरोधातच पाकिस्तानने चार युद्धे लढली आहेत, असे ते म्हणाले. 

''भारताशी युद्ध करून चांगले केले''  पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतासोबत युद्धे आवश्यक होती. जर पाकिस्तानने लढाई केली नसती तर नेपाळ आणि भूतानप्रमाणे ते भारतासमोर शरण गेले असते. या युद्धांनी हे सिद्ध केले की पाकिस्तान एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि भारतासारख्या मोठ्या देशासमोर झुकणार नाही. भारतासोबत मिळते जुळते घेतले असते तर पाकिस्तानमध्ये शांतता आणि आर्थिक विकास होऊ शकला असता, परंतु त्याची किंमत काश्मीर मुद्द्यावरील आपली भूमिका सोडून देणे ही होती, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान