शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या दमदाटीला वेसण घालण्यासाठी हवे धोरण

By admin | Updated: January 29, 2015 01:20 IST

दक्षिण चीन सागरातील आणि विभागातील चीनची दांडगाई कमी करण्यासाठी एक रणनीती ठरविण्याची आवश्यकता आहे

वॉशिंग्टन : दक्षिण चीन सागरातील आणि विभागातील चीनची दांडगाई कमी करण्यासाठी एक रणनीती ठरविण्याची आवश्यकता आहे, असे आग्रही मत अमेरिकेच्या दोन माजी लष्करप्रमुखांनी व्यक्त केले. तसेच चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य आणि आक्रमकपणावरही त्यांनी चिंता व्यक्त केली.सिनेटर जॉन मॅक्केन यांच्या अध्यक्षतेखालील सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीपुढे बोलताना सेवानिवृत्त जनरल जेम्स एन. मॅटिस म्हणाले की, प्रशांत क्षेत्रात चीनसोबतचे संबंध सकारात्मक ठेवण्याचे आमचे प्रयत्न चांगले आहेत. चीन दक्षिण सागर आणि अन्यत्र दादागिरी करणार असेल तर त्यावर अंकुश घालून स्थिती संतुलित करण्यासाठी एक धोरण आखण्याचा प्रयत्न केला जावा.या संतुलनातून प्रशांत विभागातील सुरक्षा आणि आर्थिक स्थितीतील चीनचा एकाधिकार संपुष्टात आला पाहिजे. तसेच अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने स्थिरता आणि आर्थिक समृद्धी शाबूत ठेवण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांना पाठबळ मिळाले पाहिजे, असे मॅटिस यांनी स्पष्ट केले.या समितीपुढे बोलताना सेवानिवृत्त जनरल जॉन एम. कीन म्हणाले की, आर्थिक बळावर चीनने लष्करी सामर्थ्य वाढविले आहे. त्या जोरावर चीन शेजाऱ्यांशी आक्रमक भूमिका घेत आहे. चीनने विभागीय वर्चस्वासाठी एक रणनीती अंगीकारली आहे. त्यामुळे अमेरिकेने मित्रदेशांसोबत एक धोरण आखण्याची गरज आहे. (वृत्तसंस्था)