China Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,236 बळी, जगभरात 75,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 10:41 AM2020-02-21T10:41:33+5:302020-02-21T10:43:09+5:30

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसचा फटका हा जगभरातील अनेक कंपन्यांना बसला आहे.

China Coronavirus The death toll there went up 2,236 | China Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,236 बळी, जगभरात 75,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग

China Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,236 बळी, जगभरात 75,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या संसर्गामुळे 2,236. लोक मृत्युमुखी पडले असून 75,000 पेक्षा जास्त लोकांना त्याची लागण.वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसचा फटका हा जगभरातील अनेक कंपन्यांना बसला.

बीजिंग - चीनमध्येकोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे 2,236. लोक मृत्युमुखी पडले असून 75,000 पेक्षा जास्त लोकांना त्याची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसचा फटका हा जगभरातील अनेक कंपन्यांना बसला आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. 

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. जपानच्या योकोहामा बंदराबाहेर समुद्रात असलेल्या जहाजावरील ज्या प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह आली आहे अशा 500 जणांना जहाजातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी या जहाजाला ‘अलविदा’ केला. 14 दिवसांचा हा काळ प्रवाशांसाठी त्रासदायक होता. बस आणि अनेक टॅक्सीतून हे लोक आपल्या ठिकाणांकडे रवाना झाले. 

वुहान शहरातून कोरोनाची साथ जगभरात पसरली आहे. मात्र आता चीनच्या प्रयोगशाळेमध्ये कोरोना व्हायरसची निर्मिती झाल्याची चर्चा सुरू आहे. वुहानमधील फिश मार्केट येथील एका सरकारी प्रयोगशाळेतून हा कोरोनाचा व्हायरस पसरला असल्याची माहिती मिळत आहे. चीनमधील सरकारी साऊथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीनुसार, हुबेई प्रातांत वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (WHDC) ने हा व्हायरसची निर्मिती केली असावी. शास्त्रज्ञ बोताओ शाओ आणि ली शाओ यांच्या दाव्यानुसार या प्रयोगशाळेत संसर्गजन्य रोग पसरवू शकतील अशा काही प्राण्यांना ठेवण्यात आले होते. यामध्ये 605 वटवाघळांचा समावेश होता. याच प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरसची निर्मिती झाली असावी अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी चीनने नोटांची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात आलेल्या नोटा या चलनातून नष्ट करण्यात येणार आहेत तसेच जानेवारी महिन्यानंतर बाजारात वितरित करण्यात आलेल्या नोटांना जमा करण्यात येत आहे. अल्ट्राव्हॉयलेट किरणांनी त्या नोटा स्वच्छ करण्यात येत आहेत. त्यानंतर त्यांना 14 दिवस त्यांना स्टॉकमध्ये वेगळे ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाचा व्हायरसचा संसर्ग होऊ नये यासाठी चीनने हा निर्णय घेतला आहे. चीनमधील रुग्णालये, बाजारपेठा आणि अन्य सार्वजनिक ठिकाणांहून संसर्ग झालेल्या नोटा चलनात असल्याचा धोका आहे. त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

China virus death toll surpasses 1,600, reports AFP news agency quoting government. | China Coronavirus : जगभरात ६७ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग; तब्बल १६०० बळी

कोरोना व्हायरसमुळे भारतात पॅरासिटामॉलसह अनेक औषधांच्या किमतीत 40 ते 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून वेदनाशामक औषधांच्या किमतीत वाढ झाली आहे. झायड्स कॅडीला या फार्मा कंपनीचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलची किंमत जवळपास 40 टक्के वाढली आहे. तर अझिथ्रोमायसिन या अँटिबायोटिक्सची किंमत 70 टक्क्यांनी वाढली आहे. येत्या काही दिवसात कच्चा मालाचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर अडचण होऊ शकते. 

महत्त्वाच्या बातम्या 

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका; सरपंच निवडीचा अध्यादेश काढण्यास नकार

खुशखबर ! मार्चमध्ये स्वस्त होऊ शकतो घरघुती गॅस सिलेंडर; मागील 4 महिन्यांपासून होतेय दरवाढ

मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा

मुख्यमंत्री ठाकरे आज पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींना भेटणार

 

Web Title: China Coronavirus The death toll there went up 2,236

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.