मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 08:29 AM2020-02-21T08:29:23+5:302020-02-21T08:30:41+5:30

अरविंद केजरीवाल यांच्या भगव्याविषयीच्या भूमिकेवर भाजपने लक्ष ठेवण्याची आवश्यकता 'ऑर्गनायझर'चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केली आहे.

rss mouthpiece organiser cautions bjp says pm narendra modi amit shah can not always help | मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा

मोदी-शाह प्रत्येकवेळी विजय मिळवून देऊ शकत नाही; आरएसएसचा भाजपला इशारा

Next

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर सुरू  भारतीय जनता पक्षात सुरू असलेली समीक्षा अद्याप सुरूच आहे. आता दिल्लीतील पराभवावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला इशारा दिला आहे. प्रत्येकवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच विजय मिळवून देऊ शकत नसल्याचे आरएसएसने म्हटले आहे. 

आरएसएसचे इंग्रजी मुखपत्र 'ऑर्गनायझर' मध्ये दीनदयाल उपाध्याय यांना कोट करताना दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची समीक्षा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपचे संघटन आणि उमेदवारांविषयी विस्तारीत अवलोकन करण्यात आले आहे.

प्रत्येकवेळी मोदी-शाह भाजपला विजय मिळवून देऊ शकत नाहीत. त्यासाठी संघटनेची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. संघटनेच्या स्थरावर भाजपने हे समजून घ्यायला हवं की, मोदी आणि शाह विधानसभा स्तरावरील निवडणुकीत नेहमीच मदत करू शकत नाही. स्थानिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्लीत संघटनेचे पुनर्गठन केल्याशिवाय पर्याय नसल्याचे आरएसएसने म्हटले आहे. 

दरम्यान 2015 नंतर भाजपची स्थानिक पातळीवर असलेली यंत्रणा उर्जित अवस्थेत आणण्यात आणि निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रचार आणि प्रसाराला जोर आणण्यात सातत्याने अपयश येत आहे. त्यामुळे पराभवाला समोरे जावे लागत असल्याचे दिल्ली डायवर्जेंट मेंजेट या लेखात म्हटले आहे.  यामध्ये पुढे लिहिले की, शाहीन बागविषयीचा भाजपचा नेरटीव्ह यशस्वी झाला नाही. तर अरविंद केजरीवाल यावर स्पष्ट होते. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या भगव्याविषयीच्या भूमिकेवर भाजपने लक्ष ठेवण्याची आवश्यकता 'ऑर्गनायझर'चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केली आहे.
 

Web Title: rss mouthpiece organiser cautions bjp says pm narendra modi amit shah can not always help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.