या जगाला 'शहंशाह'ची गरज नाही..; ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:52 IST2025-07-08T11:51:52+5:302025-07-08T11:52:56+5:30
Donald Trump BRICS: डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्समध्ये सामील देशांवर अतिरिक्त १०% शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे.

या जगाला 'शहंशाह'ची गरज नाही..; ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांना फटकारले
Donald Trump BRICS:ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफबाबतच्या धमक्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. जागतिक स्तरावर ग्लोबल साऊथचे समर्थन करणारे लुला म्हणाले की, 'जग आता बदलले आहे. या नवीन जगावा कोणत्याही सम्राट(शहंशाह)ची गरज नाही.'
Brazil’s Lula FIRES back at Trump’s BRICS tariff threat
— RT (@RT_com) July 7, 2025
‘I don’t even think I should comment’
Trump ‘needs to understand that the world has CHANGED’
Says if American can impose tariffs then so can other countries pic.twitter.com/qlpj5jhzf6
डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली होती की, ब्रिक्सच्या 'अमेरिकाविरोधी धोरणांमध्ये' सामील होणाऱ्या कोणत्याही देशावर अतिरिक्त १०% आयात शुल्क लादले जाईल. मात्र, ब्रिक्स शिखर परिषदेतील देशांनी सोमवारी(दि.७) राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा "अमेरिकाविरोधी" असल्याचा आरोप फेटाळून लावला.
अमेरिकेत फिरायला गेले, तिथेच काळाने घाला घातला; आई-वडीलांसह दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
यापूर्वी ट्रम्प यांनी डिसेंबर २०२४ मध्ये म्हटले होते की, जर ब्रिक्स देशांनी डॉलरला पर्यायी चलन तयार केले, तर त्यांच्यावर १०० टक्के कर लादला जाईल. या देशांकडून आम्हाला आश्वासन हवंय की, ते नवीन चलन तयार करणार नाहीत किंवा शक्तिशाली अमेरिकन डॉलरच्या जागी इतर कोणत्याही चलनाला पाठिंबा देणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला होता.
ब्रिक्स देश पर्यायी चलनाच्या शोधात
ब्रिक्स देश (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) अमेरिकन डॉलरचे जागतिक वर्चस्व कमी करण्यासाठी पर्यायी चलन किंवा पेमेंट सिस्टम विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहेत. त्यांचा उद्देश व्यापारात स्थानिक चलनांचा वापर वाढवणे, डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे आणि अमेरिकेच्या निर्बंधांपासून वाचणे हा आहे. २०२३ मध्ये ब्राझीलचे अध्यक्ष लू ला दा सिल्वा यांनी ब्रिक्स चलनाची बाजू मांडली होती.
अनेक देशांवर लादले शुल्क
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायल युद्धानंतर आता जगातील अनेक देशांवर टॅरिफ लागू करण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत १४ देशांवर मोठे टॅरिफ लादले आहेत. यामध्ये जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया आणि बांगलादेश सारख्या देशांचा समावेश आहे.