शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शियांच्या मिरवणुकीवर बांगलादेशात बॉम्बहल्ला

By admin | Updated: October 25, 2015 04:03 IST

बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये दरवर्षी निघणाऱ्या आशुरा मिरवणुकीत अल्पसंख्याक शिया समुदायाचे हजारो लोक जमा झाले असताना बॉम्बहल्ला करण्यात आला. यात १२ वर्षीय

ढाका : बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये दरवर्षी निघणाऱ्या आशुरा मिरवणुकीत अल्पसंख्याक शिया समुदायाचे हजारो लोक जमा झाले असताना बॉम्बहल्ला करण्यात आला. यात १२ वर्षीय मुलगा ठार झाला असून, ९० जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (इसिस) स्वीकारली आहे.मिरवणुकीत २० हजारांहून अधिक लोक सहभागी झालेले असताना शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन बॉम्ब फेकण्यात आले. हुसैनी दालान हे शिया समुदायासाठी १७ व्या शतकातील महत्त्वपूर्ण अध्ययन केंद्र असून, तेथेच हा हल्ला करण्यात आला. स्फोट होताच जमावातील लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. अरुंद गल्ल्यांमध्ये शेकडो लोक घुसल्यामुळे चेंगराचेंगरी झाली व त्यामुळे अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी तातडीने अधिक सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. जवानांनी लोकांना तेथून बाहेर पडण्यास मदत केली.यावर्षी देशात हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून, त्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेने स्वीकारली आहे. महिनाभरातील हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी इटालियन कामगार व जपानी शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला होता. तथापि, हा हल्ला अंतर्गत गटांनी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. लोकांत भीती पसरविण्यासाठी व अस्थिरतेचे वातावरण तयार करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे, असे पोलिसांनी म्हटले होते.पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, फेकण्यात आलेला एक बॉम्ब मुलाच्या अंगावर पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमींना सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून, बहुतांश लोकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था)