अमेरिकेत बर्फाळ वादळात जेटचा भीषण अपघात; टेकऑफ दरम्यान विमान उलटलं, सात जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 22:24 IST2026-01-26T22:22:28+5:302026-01-26T22:24:06+5:30

US plane crash Maine 2026 अमेरिकेतील मेन राज्यामध्ये बँगोर विमानतळावर टेकऑफ दरम्यान खाजगी जेट विमान उलटले.

Bombardier Challenger 600 crash news: Private jet crashes during takeoff in US blizzard, seven dead | अमेरिकेत बर्फाळ वादळात जेटचा भीषण अपघात; टेकऑफ दरम्यान विमान उलटलं, सात जणांचा मृत्यू

अमेरिकेत बर्फाळ वादळात जेटचा भीषण अपघात; टेकऑफ दरम्यान विमान उलटलं, सात जणांचा मृत्यू

अमेरिकेतील 'मेन' राज्यात एका खाजगी जेट विमानाला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँगोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी रात्री स्थानिक वेळेनुसार ७:४५ वाजता हे विमान उड्डाण करत असताना उलटले. या विमानात एकूण ८ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, 'बॉम्बार्डियर चॅलेंजर ६००' हे खाजगी जेट टेकऑफ करत असताना धावपट्टीवर उलटले. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार, "एक प्रवासी विमान उलटे झाले आहे," असा संदेश नियंत्रण कक्षाला देण्यात आला होता. विमान उलटल्यानंतर त्याला भीषण आग लागली.

बर्फाळ वादळाचा मोठा फटका
हा अपघात अशा वेळी घडला जेव्हा संपूर्ण अमेरिकेचा पूर्व भाग भीषण बर्फाळ वादळाचा सामना करत आहे. अपघाताच्या वेळी बँगोरमध्ये जोरदार हिमवृष्टी होत होती आणि व्हिजिबिलिटी (दृश्यमानता) अत्यंत कमी होती. खराब हवामान हे या अपघाताचे प्राथमिक कारण असल्याचे मानले जात आहे.

फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. हे विमान टेक्सासमधील एका प्रसिद्ध लॉ फर्मच्या नावावर नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर बँगोर विमानतळ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे.

Web Title : अमेरिका: बर्फीले तूफान में निजी जेट दुर्घटनाग्रस्त, सात की मौत

Web Summary : मेन, अमेरिका में बर्फीले तूफान के दौरान उड़ान भरते समय एक निजी जेट दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें सात लोगों की मौत हो गई। बॉम्बार्डियर चैलेंजर 600 रनवे पर पलट गया और आग लग गई। भारी बर्फबारी के कारण खराब दृश्यता को कारण माना जा रहा है। जांच जारी है।

Web Title : US: Fatal Private Jet Crash in Blizzard; Seven Dead

Web Summary : A private jet crashed during takeoff in Maine amidst a blizzard, killing seven. The plane, a Bombardier Challenger 600, flipped on the runway and caught fire. Poor visibility due to heavy snowfall is suspected as the cause. Investigation underway.