शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

बलुच नेते बुग्तींची हत्या; परवेझ मुशर्रफ दोषी

By admin | Updated: January 15, 2015 06:20 IST

पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ हे बलुच नेते नवाज अकबर खान बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी दोषी असल्याचा निकाल पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दिला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ हे बलुच नेते नवाज अकबर खान बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी दोषी असल्याचा निकाल पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने दिला आहे. बुग्ती हे लष्कराच्या दहशतवादविरोधी कारवाईत मारले गेले होते. पाकिस्तानातील क्वेट्टा येथील न्यायालयाने मुशर्रफ (७१) यांना दोषी ठरविले असून, पुढची सुनावणी ४ फेब्रुवारी रोजी होईल, असे जाहीर केले आहे. ४ फेब्रुवारीनंतर या प्रकरणाची सुनावणी दररोज होईल, असेही न्यायालयाने जाहीर केले आहे. बुग्ती हे बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री होते, तसेच त्यांच्या जमातीचेही प्रमुख होते. तत्कालीन अध्यक्ष व लष्करप्रमुख असणाऱ्या मुशर्रफ यांनी आदेश दिलेल्या लष्करी कारवाईत ते २००६ साली मारले गेले. त्यांच्या हत्येनंतर संपूर्ण देशात निषेध मोर्चे निघाले. त्यानंतर बलुचिस्तानात सशस्त्र दहशतवाद पुन्हा सुरू झाला. बुग्ती यांच्या हत्येप्रकरणी मुशर्रफ यांच्याबरोबर आणखी दोन आरोपी आहेत. मुशर्रफ यांचे गृहमंत्री आफताब खान शेरपाओ व माजी प्रांतिक गृहमंत्री शोएब नुशरवान हेही या प्रकरणी दोषी ठरले आहेत. सुनावणीत आधी मुशर्रफ यांच्या वकिलाने त्यांचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला. मुशर्रफ यांना पाठदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित न राहण्याची परवानगी द्यावी, असे वकिलांनी म्हटले होते. खटला सुरू झाल्यापासून मुशर्रफ कधीच न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळेच त्यांना दोषी ठरविले गेले असेही बोलले जात आहे. मुशर्रफ यांच्यावर २००७ साली माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांची हत्या केल्याचाही आरोप आहे. त्या प्रकरणी त्याना जामीन मिळाला आहे. (वृत्तसंस्था)