आमच्याकडे या, स्मार्टफोन बनवा! पाकिस्तानचे Appleला निमंत्रण! सॅमसंग तर आधीच गेलीय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:58 IST2026-02-19T14:57:05+5:302026-02-19T14:58:55+5:30

Apple Manufacturing in Pakistan : पाकिस्तानने ऍपल आणि सॅमसंगला देशात प्लांट उभारण्याचे निमंत्रण दिले आहे. पण आर्थिक संकट आणि करांच्या बोजामुळे हे शक्य होईल का? वाचा विशेष रिपोर्ट.

Apple made in Pakistan : Come to us, make smartphones! Pakistan invites Apple! Samsung has already left... | आमच्याकडे या, स्मार्टफोन बनवा! पाकिस्तानचे Appleला निमंत्रण! सॅमसंग तर आधीच गेलीय...

आमच्याकडे या, स्मार्टफोन बनवा! पाकिस्तानचे Appleला निमंत्रण! सॅमसंग तर आधीच गेलीय...

इस्लामाबाद: पाकिस्तानने आपल्या देशात मोबाईल उत्पादनाला चालना देण्यासाठी आता जागतिक दिग्गज कंपन्या ऍपल आणि सॅमसंग यांना अधिकृतपणे निमंत्रण दिले आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारने 'मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण उत्पादन धोरण २०२६-३३ अंतिम केले असून, याद्वारे पाकिस्तानला मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचे प्रादेशिक हब बनवण्याचे स्वप्न पाहिले जात आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

पाकिस्तानच्या इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट बोर्डाने तयार केलेल्या या नव्या धोरणानुसार, परदेशी कंपन्यांना पाकिस्तानात प्लांट उभारण्यासाठी आकर्षित केले जाणार आहे. स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि परकीय गुंतवणूक वाढवणे, जुन्या किंवा रिफर्बिश्ड मोबाईलची पुनर्निर्यात करून वार्षिक ३०० ते ४०० दशलक्ष डॉलर्स महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी स्थानिक पातळीवर सुटे भाग तयार करणाऱ्या कंपन्यांना विशेष कर सवलती दिल्या जाणार आहेत.

सॅमसंगची उपस्थिती आणि ऍपलचे आव्हान
सॅमसंगने याआधीच स्थानिक कंपन्यांच्या भागीदारीतून पाकिस्तानात असेंब्ली सुरू केली आहे, मात्र ती अजूनही पूर्णपणे 'मॅन्युफॅक्चरिंग' स्तरावर पोहोचलेली नाही. दुसरीकडे, ऍपलसाठी पाकिस्तान हा एक कठीण बाजार आहे. पाकिस्तानात आयफोनवर प्रचंड आयात शुल्क असल्याने सॅमसंगच्या तुलनेत ऍपलची किंमत तिथे खूप जास्त आहे. यामुळेच ऍपल पाकिस्तानात प्लांट उभारणार का, याबाबत तज्ज्ञांमध्ये साशंकता आहे.

खरोखरच चित्र बदलेल का?
पाकिस्तानात सध्या ९५% मोबाईलची विक्री स्थानिक असेंब्लीच्या मोबाईलची होत आहे. या मोबाईलमधील बहुतांश भाग चीनमधून आयात केले जातात. डॉलरची वाढती किंमत आणि परकीय चलनाचा तुटवडा ही मोठी अडचण आहे. मोबाईलवर १८% ते २०% विक्री कर लावल्याने उत्पादनात घट झाली आहे. वीज टंचाई आणि कच्च्या मालाची उपलब्धता यांवर पाकिस्तानला अजून खूप काम करावे लागणार आहे.

Web Title : पाकिस्तान का एप्पल को स्मार्टफोन बनाने का निमंत्रण; सैमसंग पहले से मौजूद

Web Summary : पाकिस्तान का लक्ष्य मोबाइल निर्माण केंद्र बनना है, जिसके लिए एप्पल और सैमसंग को आमंत्रित किया गया है। सैमसंग पहले से ही फोन असेंबल कर रहा है, लेकिन उच्च आयात करों के कारण एप्पल को चुनौतियों का सामना करना पड़ रहा है। पाकिस्तान को स्थानीय उत्पादन को बढ़ावा देने और विदेशी निवेश को आकर्षित करने की उम्मीद है, भले ही आर्थिक बाधाएं हों।

Web Title : Pakistan Invites Apple to Manufacture Smartphones; Samsung Already Present

Web Summary : Pakistan aims to become a mobile manufacturing hub, inviting Apple and Samsung. Samsung already assembles phones, but Apple faces challenges due to high import taxes. Pakistan hopes to boost local production and attract foreign investment, despite economic hurdles.