शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 08:46 IST

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट चर्चा करावी जेणेकरून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. जर असे झाले नाही तर चीन या दुराव्याचा फायदा घेईल, असेही हेली यांनी सुचवले आहे.

अमेरिका-भारत संबंध तुटण्याच्या मार्गावर आहेत, असा स्पष्ट इशारा संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला दिला आहे. त्या म्हणाल्या, जर चीनच्या वाढत्या महत्वाकांक्षांना लगाम घालाण्याची अमेरिकेची इच्छा असेल, तर त्याला भारतासोबतच्या संबंधांना प्राधान्य द्यावे लागेल.

न्यूजवीकमध्ये बुधवारी (20 ऑगस्ट 2025) प्रसिद्ध झालेल्या एका लेखात हेली यांनी म्हलटे आहे की, "आपले लक्ष्य चीन आहे, या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे अमेरिकेने दुर्लक्ष करू नये. त्याचा सामना करण्यासाठी अमेरिकेला भारताच्या रूपाने एक मित्र असायला हवा.

टॅरिफ आणि रशियन तेलावरून वाद -व्यापार वाद आणि रशियन तेलाच्या आयातीवरून अमेरिका आणि भारत यांच्यात तणाव वाढला असतानाच हेली यांचे हे विधान आले आहे. भारताने रशियन तेल खरेदी सुरूच ठेवल्याने, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% परस्पर शुल्क तर २५% अतिरिक्त शुल्क (टॅरिफ) लादले आहे. जे २७ ऑगस्टपासून लागू होईल. भारताच्या तेल खरेदीमुळे युक्रेन युद्धात रशियाला आर्थिक मदत मिळत आहे, हे हेली यांनी मान्य केले. मात्र याच वेळी, भारतासोबत शत्रूसारखा व्यवहार करणे ही एक धोरणात्मक चूक ठरेल, असा इशाराही त्यांनी ट्रम्प प्रशासनाला दिला आहे.

चीनला लगाम घालण्यात भारताची मोठी भूमिका - हेली पुढे म्हणाल्या, "आशिया खंडात चीनच्या वर्चस्वाचा सामना करण्याची ताकद असलेला एकमेव देश भारत आहे. भारताकडे चीन प्रमाणेच मॅन्यूफॅक्चरिंग पॉवर आहे. यामुळे अमेरिकेला चीनऐवजी भारताच्या माध्यमाने आपली पुरवठा साखळी मजबूत करण्यास मदत होऊ शकते. भारताचे अमेरिका आणि इस्रायल सारख्या देशांसोबत असलेले बळकट संरक्षण संबंध त्याला जगाच्या सुरक्षिततेसाठी मजबूत बनवतात. एवढेच नाही, तर आगामी काळात भारत, चीनच्या महत्वाकांक्षेला कमकुवत करेल, असेही हेली यांचे म्हणणे आहे.

ट्रम्प-मोदी यांनी चर्चा करावी - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट चर्चा करावी जेणेकरून दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होतील. जर असे झाले नाही तर चीन या दुराव्याचा फायदा घेईल, असेही हेली यांनी सुचवले आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतchinaचीनTrade Tariff Warटॅरिफ युद्ध