शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

"मला माझे..."; धडाधड गोळीबार सुरू असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांना जीवापेक्षा महत्वाची वाटली 'ही' एक गोष्ट! बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2024 18:06 IST

Donald Trump Firing : ...पण ट्रम्प जीवघेणा हल्ला होऊनही निश्चिंत दिसले. जेव्हा सीक्रेट सर्व्हिस एजन्ट ट्रम्प यांना सावरत होते, तेव्हा ट्रम्प यांना आपल्या जीवापेक्षाही एक गोष्ट अधिक म्हत्वाची वाटली. माहीत आहे काय?

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प झालेल्या हल्ल्यातून अगदी थोडक्यात बचावले आहेत. त्यांच्या कानाला गोळी लागली आहे. मात्र, गोळी लागूनही ते काही वेळातच आपल्या पायावर उभेही राहिले. घटना घडली तेव्हा ट्रम्प यांचे समर्थक प्रचंड भयभीत झाले होते. पण ट्रम्प जीवघेणा हल्ला होऊनही निश्चिंत दिसले. जेव्हा सीक्रेट सर्व्हिस एजन्ट ट्रम्प यांना सावरत होते, तेव्हा ट्रम्प यांना आपल्या जीवापेक्षाही एक गोष्ट अधिक म्हत्वाची वाटली. माहीत आहे काय? त्यांचे 'बूट'. या गोष्टीवर आपला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.

बघा व्हिडिओ -आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की, एवढा भयंकर आणि जीवघेणा हल्ला झालेला असतानाही ट्रम्प आपल्या बुटांसंदर्भात बोलत आहेत. गोळीबार थांबल्यानंतर आणि हल्लेखोर ठार झाल्यानंतर, काही सैनिक ट्रम्प यांना पुढे चालण्यास सांगत आहेत. यावेळी ट्रम्प त्यांना, 'मला माझे शूज घेऊ द्या,' असे म्हणताना दिसत आहेत. शूज घातल्यानंतर ट्रम्प आपल्या समर्थांकांना हाताची मूठ दाखवत 'लढा... लढा...' म्हणाले. यानंतर समर्थकांनीही घोषणा दिल्या आणि ट्रम्प खरा योद्धा असल्याचे म्हणाले.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी पेनसिल्व्हेनियामध्ये एका प्रचारसभेदरम्यान जीवघेणा हल्ला झाला. हल्ला होताच यूएस सीक्रेट सर्व्हीस एजन्ट्स सावध झाले आणि त्यांनी ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवले. तसेच प्रत्युत्तरात कारवाई करत हल्लेखोरालाही जागीच ठार केले. या हल्लेखोराचे नाव थॉमस मॅथ्यू क्रूक्स (Thomas Matthew Crooks) असे होते. तो २० वर्षांचा होता.

ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण व्हिडिओ... -

व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावरून झाली फायरिंग -डोनाल्ड ट्रम्प ज्या व्यासपीठावरून भाषण देत होते, त्या व्यासपीठापासून 120 मीटर अंतरावर असलेल्या एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या छतावरून हल्लेखोराने गोळीबार केला. बटलर फार्म शोग्राऊंडवर डोनाल्ड ट्रम्प यांचे ओपन-एअर कँपेन आयोजित करण्यात आली होती. येथे एवढी मोकळी जागा होती की, स्नायपरला निशाणा साधण्यात कसल्याही प्रकारची अडचण आली नाही. हल्लेखोर आपल्या जागेवरून ट्रम्प यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय स्पष्टपणे बघू शकत होता.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिका