शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 01:57 IST

Donald Trump's One Big Beautiful Bill Passes : विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर, व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता आपल्या मोठ्या कर सवलत आणि खर्च कपात विधेयकावर स्वाक्षरी करण्याचा विचार करत आहेत...

Donald Trump's One Big Beautiful Bill Passed : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 'वन बिग ब्युटीफुल बिल' गुरुवारी रात्री उशिरा प्रतिनिधी सभागृहातही (हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्हज) २१८-२१४ मतांनी मंजूर झाले आहे. हे ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मोठे यश मानले जाते आहे. सिनेट आणि प्रतिनिधी सभागृहातून मंजूर झाल्यानंतर, हे बिल अथवा विधेयक आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, या विधेयकावरील मतदानादरम्यान, दोन रिपब्लिकन खासदारांनी पक्षाची बाजू सोडून डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने मतदान केले.

विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर, व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता आपल्या मोठ्या कर सवलत आणि खर्च कपात विधेयकावर स्वाक्षरी करण्याचा विचार करत आहेत. 

८०० हून अधिक पानांचे हे विधेयक मंजूर करण्यासाठी ट्रम्प यांना मोठे परिश्रम घ्यावे लागले आहेत. या विधेयकासाठी जीओपी नेत्यांना रात्रभर काम करावे लागले. तसेच, ट्रम्प यांनी पुरेशी मते मिळविण्यासाठी होल्डआउटवर वैयक्तिकरित्या दबावही टाकला होता.विधेयकात नेमके काय...?या विधेयकात, कर कपात, लष्करी बजेट, संरक्षण आणि ऊर्जा उत्पादनासाठी वाढलेला खर्च, तसेच आरोग्य आणि पोषण कार्यक्रमांवरील खर्चात कपात, अशा प्रमुख तरतुदींचा समावेश आहे. याशिवाय, हे विधेयक बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मोठ्या प्रमाणात हद्दपारीसाठी वाढत्या खर्चाशी देखील संबंधित आहे. तर, इतर विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की, या खर्चाचा देशाच्या आरोग्य आणि शिक्षणासारख्या क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळेच, उद्योगपती इलॉन मस्कसह एक मोठा वर्ग या विधेयकाच्या विरोधात आहे आणि यावर टीका करत आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिका