Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 12:16 IST2025-06-13T12:15:17+5:302025-06-13T12:16:08+5:30
Air India Flight Emergency Landing: दिल्लीला येणाऱ्या Air India च्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर थायंलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
Air India Flight Emergency Landing: अहमदाबात विमान अपघातानंतर आता आज(दि. १३) एअर इंडियाच्याविमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. थायलंडमधील फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान एआय ३७९ ला धमकी मिळताच विमानाची परत थायलंडमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आली. सुदैवाने विमानातील सर्व १५६ प्रवासी सुरक्षित आहेत. धमकी देणाऱ्या व्यक्तीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
Reuters reports that, "an Air India flight from Thailand's Phuket to India's capital New Delhi received a bomb threat on Friday and made an emergency landing on the island, airport authorities said." pic.twitter.com/iMwR2DOTci
— ANI (@ANI) June 13, 2025
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता फुकेतच्या थायलंड बेटावरुन दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी मिळाली आहे. एका क्रू मेंबर विमानातील टॉयलेटजवळ बॉम्बच्या धमकीची चिठ्ठी आढळून आली. यानंतर तात्काळ विमानाला परत फुकेतच्या दिशेने वळवण्यात आले. लँडिंगनंतर लगेचच विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. सध्या विमानाची कसून तपासणी केली जात आहे.
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
इराण-इस्रायल युद्धामुळे विमान परतले
इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांनी त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे भारतातून उड्डाण घेणारी अनेक विमाने वळवण्यात आली आहेत. मुंबईहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे विमानही अर्ध्यातून माघारी बोलवण्यात आले. याबाबत एअर इंडियाने लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.