शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

पुन्हा शियापंथीय टार्गेट; मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याने हाहाकार, ३० जण मृत्युमुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 16:16 IST

Explosion reported at a Shia Mosque in Kandahar : अफगाण नागरिकांना आणि विशेषत: शियांना कोणतीही सुरक्षा देण्यात तालिबान स्पष्टपणे अपयशी ठरला आहे. 

ठळक मुद्देकंदहारमधील शिया मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात आज जवळपास 30 जण ठार झाले.

अफगाणिस्तानच्या कंदहारमधील शिया मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात आज जवळपास 30 जण ठार झाले. तर जवळपास 20 जण जखमी झाले, असे स्थानिक रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले. या बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर, हे बॉम्बस्फोट कोणी घडवून आणले, याबद्दल अद्याप कोणतीच माहिती नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यात उत्तरेकडील कुंदुज शहरातील एका मशिदीत आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली होती.

अफगाण नागरिकांना आणि विशेषत: शियांना कोणतीही सुरक्षा देण्यात तालिबान स्पष्टपणे अपयशी ठरला आहे. अफगाणिस्तानातील कुंदूझ येथे शियापंथीयांच्या मशिदीत गेल्या आठवड्यात घडविण्यात आलेल्या बाॅम्बस्फोटात सुमारे १०० जण ठार किंवा जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही.

 

याआधी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानमध्ये अशाप्रकारचे हल्ले, बॉम्बस्फोट घडविले आहेत. मात्र, त्या संघटनेने शुक्रवारच्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. कुंदूझ येथे शुक्रवारी मशिदीत नमाज पठणासाठी भाविक जमलेले असताना हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. अफगाणिस्तानात शियापंथीय अल्पसंख्याक आहेत. तालिबानींनी त्या देशावर कब्जा केल्यानंतर तेथील स्थिती अधिकच बिघडली आहे. त्यात आता नागरिकांवरच हल्ले होत असल्याने परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

कुंदूज प्रांताचे पोलीस उपप्रमुख दोस्त मोहम्मद ओबैदा म्हणाले की, मशिदीत असलेल्या भाविकांपैकी बहुसंख्य लोक बॉम्बस्फोटात ठार झाले आहेत. आत्मघाती हल्लेखोरामार्फत हा बॉम्बस्फोट घडविण्यात आला. सर्वांच्या रक्षणासाठी तालिबान सरकार योग्य उपाययोजना करणार असल्याची माहिती दिली होती. 

 

टॅग्स :MosqueमशिदAfghanistanअफगाणिस्तानBlastस्फोटDeathमृत्यू