पाकिस्तानी चहावाल्यानंतर आता नेपाळची भाजीवाली होतीये व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 16:48 IST2016-11-02T16:48:30+5:302016-11-02T16:48:30+5:30

पाकिस्तानी चहावाल्यानंतर आता नेपाळची भाजीवाली व्हायरल होऊ लागली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत

After the Pakistani tea, Nepalese bacteria are now viral | पाकिस्तानी चहावाल्यानंतर आता नेपाळची भाजीवाली होतीये व्हायरल

पाकिस्तानी चहावाल्यानंतर आता नेपाळची भाजीवाली होतीये व्हायरल

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - इंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा भरोसा नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा निळ्या डोळ्यांचा चहावाला व्हायरल झाला होता. अर्शद खानच्या निळ्या डोळ्यांवर सगळेच भाळले होते. पण याच इंटरनेटर ठराविक वेळानंतर लोक जुनं विसरुन नवं काहीतरी शोधत फिरत असतात. त्यामुळे आता अर्शद खान जुना झाला असून सध्या नेपाळची भाजीवाली व्हायरल होऊ लागली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. 
 
अर्शद खानप्रमाणे कोणतरी या मुलीला पाहिलं आणि तिचा फोटो ऑनलाइन शेअर केला. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार रुपचंद्र महाजन यांनी हा फोटो क्लिक करुन शेअर केला. गोरखा आणि चितवान ब्रीजवर या मुलीचे फोटो काढण्यात आले. ऑनलाइन फोटो शेअर केल्यानंतर अर्शद खानप्रमाणे हिदेखील व्हायरल होऊ लागली आहे. 
 
 

Web Title: After the Pakistani tea, Nepalese bacteria are now viral