शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कॅनरा बँकेकडून अखेर वादग्रस्त भरती अर्ज मागे

By admin | Updated: July 14, 2014 00:39 IST

उमेदवाराची खासगी वैद्यकीय माहिती भरणे आवश्यक असलेला वादग्रस्त भरती अर्ज कॅनरा बँकेने मागे घेतला आहे.

चेन्नई : उमेदवाराची खासगी वैद्यकीय माहिती भरणे आवश्यक असलेला वादग्रस्त भरती अर्ज कॅनरा बँकेने मागे घेतला आहे. कॅनरा बँकेतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून खासगी वैद्यकीय माहिती मागविण्यात आली होती. यामध्ये महिला उमेदवारांना मासिक पाळीचा इतिहास, छातीचा आकार व गर्भधारणेविषयीचा पुरावा मागविला होता. यावरून वाद निर्माण झाल्याने बँकेने तो अर्ज मागे घेतला आहे. देशभरातील बँक संघटनांनी निदर्शने केल्यानंतर कॅनरा बँकेने पाच पानांचा ‘मेडिकल फार्म’ मागे घेतला आहे. वैयक्तिक इतिहासाचा नमुना रोखण्यात आला आहे. रुजू होणाऱ्या उमेदवारांना प्रश्नावलीचा नमुना सादर करण्याची आवश्यकता नाही, असे बँकेच्या निवेदनात म्हटले आहे. लेखी परीक्षा व मुलाखत दिलेल्या उमेदवारांचा अपमान आहे. वैद्यकीय तपासणी एक साधी औपचारिकता होती. पण तिसऱ्या फेरीत ती स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आली, असे भारतीय बँक एम्प्लाईज फेडरेशनचे (तामिळनाडू) सरचिटणीस सी. पी. क्रिष्णन म्हणाले. उमेदवार गरोदर आढळल्यास वैद्यकीय अधिकारी त्या उमेदवाराची लगेच नियुक्ती रोखू शकत होते. मानवी हक्कांचे उल्लंघन आणि लिंगभेद असल्याचे सांगून संघटनांचे कर्मचारी व कार्यकर्त्यांनी त्यास विरोध केला होता. याशिवाय किडनीचा आजार, हृदयविकार, मधुमेह, एचआयव्ही आणि कर्करोग असल्यास उमेदवार नोकरीसाठी अपात्र ठरविला जाऊ शकत होता. हे निश्चितच कायदाविरोधी आहे. हे कायद्यासमोर सर्व समान आणि कायद्याचे सर्वांना समान संरक्षण या घटनेतील तरतुदीविरुद्ध आणि असंवेदनशीलदेखील आहे. एखाद्या महिलेला लिंग किंवा तिच्या प्रजननक्षमता किंवा अन्य कारणाने किंवा एखाद्या व्यक्तीला एचआयव्ही किंवा इतर कारणाने भेदाभेद केला जाऊ शकत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाचे वकील सुधा रामालिंगम म्हणाल्या. (वृत्तसंस्था)