शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

Kabul Airport: काबूलमध्ये निर्माण झालीय 'पॅलेस्टाईन-इस्रायल'सारखी स्थिती, नेमकं कोण करतय रॉकेट हल्ले?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 2:57 PM

काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सोमवारी असाच देखावा बघायला मिळाला. विमानतळाला लक्ष्य करून हे रॉकेट डागण्यात आले होते. हे पाचही रॉकेट विमानतळाजवळूनच डागण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

काबूल - अफगाणिस्तानात रॉकेट हल्ले सुरू आहेत आणि अशा परिस्थितीतच अमेरिका आपले सैन्य माघारी घेत आहे. काबूल विमानतळावरील आत्मघाती हल्ल्यानंतर तेथील परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. आपल्या जवानांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अमेरिका सातत्याने हवाई हल्ले करत आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास एक मोठा पलटवारही झाला. येथील परिस्थिती इस्रायल-पॅलेस्टाइन प्रमाणे झाली आहे. काही दिवसांपूर्वी, तेथेही अशाच प्रकारे आकाशातून रॉकेटचा वर्षाव होताना दिस होता. (Afghanistan who launch rocket in kabul airport american troops taliban isis) काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सोमवारी असाच देखावा बघायला मिळाला. विमानतळाला लक्ष्य करून हे रॉकेट डागण्यात आले होते. हे पाचही रॉकेट विमानतळाजवळूनच डागण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, हे रॉकेट काबूल विमानतळाला लक्ष्य करूनच कारमधून डागण्यात आले. मात्र, हे रॉकेट एअर फिल्ड डिफेन्स सिस्टीमने निष्क्रिय करण्यात आले. यातील एक रॉकेट वसती भागात पडले.

''तालिबानला मान्यता द्या अन्यथा होऊ शकतो ९/११ सारखा हल्ला''

यापूर्वी रविवारी अमेरिकेकडून हल्ला झाला होता. म्हणजेच दोन्ही बाजूंनी हवेत प्रतिहल्ले सुरू आहेत. सोमवारी सकाळी काबूलच्या आकाशात रॉकेटच्या गडगडाटाने संपूर्ण शहर हादरले होते. सर्वत्र धूर दिसत होता. एपीने प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने म्हटले आहे, की हे रॉकेट काबूलच्या सलीम कारवां भागात पडले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. लोक धावू लागले. केवळ रॉकेटच नाही, तर यानंतर गोळीबाराचा आवाजही ऐकू आला.

अफगाणिस्तानची राजधानीत सकाळी-सकाळीच कुणी हदरविण्याचा प्रयत्न केला? हे अद्याप  स्पष्ट झालेले नाही. काबूल विमानतळ सध्या पूर्णपणे अमेरिकन लष्कराच्या ताब्यात  आहे आणि तालिबानही तेथे उपस्थित आहे.

तालिबानला जगातील सर्वच देशांसोबत हवे आहेत चांगले संबंध; भारतासंदर्भात केलं असं भाष्य

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू - आयसिसच्या दहशतवाद्यांना संपविण्याच्या तसेच संभाव्य हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेने काबूलमध्ये ड्रोन हल्ले केले. यामध्ये सहा मुलांसह 9 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. यामुळे बायडेन सरकारवर टीका होऊ लागली आहे. हे सर्व मृत एकाच कुटुंबातील होते. इस्‍लामिक स्‍टेट खुरासान गटाचे दहशतवादी काबूल विमानतळावर आणखी हल्ले करण्याच्या तयारीत आहेत. हे दहशतवादी बसलेल्या एका वाहनाला ड्रोनने उडविण्यात आले. हे वाहन रहिवासी भागातून जात होते. यामुळे त्या परिसरात असलेल्या 9 लोकांचा मृत्यू झाला.  

टॅग्स :Kabul Bomb Blastकाबूल बॉम्बस्फोटAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिकाISISइसिसTalibanतालिबानterroristदहशतवादी