तालिबानला जगातील सर्वच देशांसोबत हवे आहेत चांगले संबंध; भारतासंदर्भात केलं असं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 08:12 PM2021-08-29T20:12:46+5:302021-08-29T20:15:13+5:30

भारताने अफगाण लोकांच्या हिताच्या दृष्टीने आपले धोरण ठरवावे, अशी आमची इच्छा आहे, असेही झुबीउल्लाह मुजाहिदने म्हटले आहे.

Taliban want good relations with all countries including india says taliban spokesperson | तालिबानला जगातील सर्वच देशांसोबत हवे आहेत चांगले संबंध; भारतासंदर्भात केलं असं भाष्य

तालिबानला जगातील सर्वच देशांसोबत हवे आहेत चांगले संबंध; भारतासंदर्भात केलं असं भाष्य

googlenewsNext

इस्लामाबाद -तालिबानलाभारतासह सर्वच देशांसोबत चांगले संबंध हवे आहेत. अफगाणिस्तानची भूमी आता कुठल्याही देशाविरुद्ध वापरू दिली जाणार नाही. तालिबानभारताला या क्षेत्रातील एक महत्त्वाचा भाग मानतो, असे तालिबानचा प्रवक्ता झुबीउल्लाह मुजाहिदने म्हटले आहे. यासंदर्भात पाकिस्तानच्या एआरवाय वृत्तवाहिनीनेही वृत्त दिले आहे.

भारताने अफगाण लोकांच्या हिताच्या दृष्टीने आपले धोरण ठरवावे, अशी आमची इच्छा आहे, असेही झुबीउल्लाह मुजाहिदने म्हटले आहे. अमेरिकन सैन्य माघारीच्या दोन आठवडे आधी, म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळविला. अफगाणिस्तानमध्ये 'तेहरीक ए तालिबान पाकिस्तान' आणि 'इस्लामिक स्टेट' पुन्हा तोड वर काढण्याच्या शक्यते संदर्भातील एका प्रश्नाला उत्तर देताना मुजाहिद म्हणाला, "यापूर्वीही आम्ही स्पष्ट केले आहे, की आमची भूमी इतर कुठल्याही देशाविरोधात वापरू दिली जाणार नाही. आमचे धोरण अगदी स्पष्ट आहे. ”

काबुल विमनातळाजवळ अजून एक बॉम्बस्फोट, इस्लामिक स्टेट खोरासनवर हल्ल्याचा संशय

वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान हे दोघेही शेजारी असल्याने आणि त्यांचे हित एकमेकांशी संबंधित असल्याने त्यांना सोबत बसून प्रलंबित समस्यांवर तोडगा काढावा लागेल. याच बरोबर अफगाणिस्तान मुक्त केल्याचा आम्हाला अभिमान आहे. लवकरच शरिया कायद्यानुसार सरकार स्थापन होईल, असे मुजाहिदने म्हटले आहे.

तालिबानने अफगाणिस्तानात राहणाऱ्या लोकांना वचन दिले आहे, की 'आपण सुरक्षित राहाल. तुमचा दरवाजा कुणीही ठोठावणार नाही. अफगाणिस्तानात कुणीही कुणाचे अपहरण करू शकणार नाही. कुणीही कुणाला मारू शकणार नाही, आम्ही नियमितपणे सुरक्षा वाढवू. आमच्या राजवटीत देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांचे राहणीमान उंचावेल. याशिवाय, कायदा आणि सुव्यवस्था राखणे, ही आमची पहिली जबाबदारी आहे. यानंतर लोक शांततेत राहू शकतील, असे तालिबानने म्हटले आहे.

अमेरिकेची महाभयंकर चूक, तालिबानला सोपवली 'अफगाण सहकाऱ्यांची' यादी...!

Web Title: Taliban want good relations with all countries including india says taliban spokesperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.