Afghanistan Crisis: तालिबानपासून वाचवण्यासाठी अमेरिकन सैनिकांच्या हाती दिलेल्या त्या मुलाचे पुढे काय झाले? समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 01:35 PM2021-11-06T13:35:59+5:302021-11-06T13:36:54+5:30

Afghanistan Crisis: मिर्झा अली अहमदी आणि त्यांची पत्नी सुराया हे पाच मुलांसह Kabul Airportवर आले होते. तिथे त्यांनी त्यांचा दोन महिन्यांचा मुलगा अमेरिकन सैनिकांकडे दिला होता. मात्र आता त्या मुलाचा काहीच ठावठिकाणा लागत नाही आहे.

Afghanistan Crisis: What happened to the boy who was handed over to US troops to save him from the Taliban? Shocking information came to the fore | Afghanistan Crisis: तालिबानपासून वाचवण्यासाठी अमेरिकन सैनिकांच्या हाती दिलेल्या त्या मुलाचे पुढे काय झाले? समोर आली धक्कादायक माहिती

Afghanistan Crisis: तालिबानपासून वाचवण्यासाठी अमेरिकन सैनिकांच्या हाती दिलेल्या त्या मुलाचे पुढे काय झाले? समोर आली धक्कादायक माहिती

Next

काबुल - अमेरिकन सैन्याने माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर तालिबानने  अफगाणिस्तानमधील एकेका प्रांतावर कब्जा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, तालिबानचा प्रभाव वाढू लागल्यानंतर अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरास सुरुवात केली होती. अशा लोकांनी काबुल विमानतळावर गर्दी केली होती. कुठला ना कुठला देश एअर लिफ्ट करून आपल्याला नेईल, अशी त्यांना आशा होती. मिर्झा अली अहमदी आणि त्यांची पत्नी सुराया हे पाच मुलांसह काबुल विमानतळावर आले होते. तिथे त्यांनी त्यांचा दोन महिन्यांचा मुलगा अमेरिकन सैनिकांकडे दिला होता. मात्र आता त्या मुलाचा काहीच ठावठिकाणा लागत नाही आहे.

मिर्झा अली अहमदी सांगतात की, ते १९ ऑगस्ट रोजी पत्नी आणि मुलांसह काबुल विमानतळाच्या बाहेर होतो. तिथे खूप गर्दी होती. आमचा दोन महिन्यांचा मुलगा सोहेल याला दुखापत होऊ नये यासाठी आम्ही काळजीत होतो. यादरम्यान, पाच मीटर उंच भिंतीवर असलेल्या एका अमेरिकन सैनिकाने आम्हाला मदत हवी आहे का, अशी विचारणा केली. तेव्हा मिर्झा यांनी सोहेलला त्या सैनिकाकडे सोपवले. काही वेळाने आत गेल्यावर सोहेल भेटेल अशी त्यांना अपेक्षा होती.

मात्र ते आत गेले तेव्हा सोहेल कुठेच दिसला नाही. मिर्झा अली यांनी १० वर्षे अमेरिकी दूतावासामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम केले होते. त्याने त्याच्या मुलाबाबत प्रत्येक अधिकाऱ्याकडे विचारणा करण्यास सुरुवात केली. एका सैन्य कमांडरने त्यांना सांगितले की, विमानतळ लहान मुलासाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे त्या मुलांसाठीच्या विशेष क्षेत्रात नेण्यात आले असावे. मात्र जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा तो भाग रिकामी होता.

मीडिया रिपोर्टनुसार मिर्झा अली यांनी सांगितले की, अमेरिकन कमांडर विमानतळाच्या चारी बाजूंना माझ्यासोबत शोध घेण्यासाठी आला. त्यांनी सांगितले की, त्यांना कमांडरचे नाव कधीच कळले नाही कारण तो इंग्रजी बोलत होता. तसेच संवाद साधण्यासाठी सहकाऱ्यांची मदत घेत होता. यामध्ये तीन दिवस निघून गेले.

मिर्झा अली या गोंधळामध्ये पत्नी आणि इतर चार मुलांसह आधी जर्मनीला  आणि तिथून अमेरिकेत पोहोचले. सध्या ते अमेरिकेत वास्तव्यासाठी ठिकाण शोधत आहेत. मिर्झा अली सांगतात की, ते ज्या व्यक्तीला भेटतात ते त्यांना सोहेलबाबत सांगतात. प्रत्येकजण त्यांना आपल्याकडून मदत करतो, असे असे आश्वासन देतात. मात्र पुढे काहीच होत नाही.

याबाबत अमेरिकन सरकारमधील एक अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाबाबत सर्व एजन्सींना कळवण्यात आले आहे. ज्यामध्ये अमेरिकी तळ आणि परदेशातील ठिकाणांचाही समावेश आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, या मुलाला काबुल विमानतळावर शेवटचे पाहिले गेले होते. मात्र दुर्दैवाने त्यानंतर या मुलाचा काही ठावठिकाणा लागलेला नाही. 

Web Title: Afghanistan Crisis: What happened to the boy who was handed over to US troops to save him from the Taliban? Shocking information came to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.