शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांना प्रशिक्षण, सात लाख कोटी रुपये दिले; इम्रान खान यांचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 09:49 IST

अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू होते.

इस्लामाबाद : अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने दहशतवाद्यांना जन्माला घातले आहे. एवढेच नाही तर दहशतवाद्यांवर अर्थव्यवस्थेचे सात लाख कोटी रुपये खर्च केले असल्याचा धक्कादायक खुलासा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. गृहमंत्र्यांच्या कबुलीनंतर पाकच्या पंतप्रधानांनीही अमेरिकेने पैसा दहशतवादासाठी पुरवल्याचे कबुल केले आहे. 

अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. यावेळी सोव्हिएतविरोधात जिहाद पुकारण्यासाठी अमेरिका पैसे पुरवत होती, असा धक्कादायक खुलासा खान यांनी केला आहे. 80 च्या दशकात जेव्हा सोव्हिएतने अफगानिस्तानवर कब्जा केला तेव्हा आणि या मुजाहिद्दीन लोकांना त्यांच्याविरोधात दहशतवादाचे प्रशिक्षण दिले होते. त्यांना पाकिस्तानने प्रशिक्षण दिले होते. यासाठी अमेरिकेच्या सीआयएकडून पैसा पुरविला जात होता. आता एका दशकानंतर अफगाणिस्तानामध्ये अमेरिका आली आहे. त्याच जिहादींना अमेरिका दहशतवादी म्हणत असल्याच आरोपही खान यांनी केला. 

हा मोठा विरोधाभास होता आणि मी तो अनुभवला. पाकिस्तानने तेव्हा तटस्थ राहायला हवे होते कारण यामध्ये सहभागी झाल्याने मोठा गट आमच्या विरोधात गेला आहे. आम्ही 70 हजार लोकांना गमावले. त्यांच्यावर अर्थव्यवस्थेचे 7 लाख कोटी रुपये खर्च केले. शेवटी अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये यश न मिळविल्याचा ठपका पाकिस्तानवर ठेवला. मला वाटते हा पाकिस्तानवर झालेला अन्याय आहे, असे इम्रान खान म्हणाले. 

गुरुवारी पाकिस्तानचे गृहमंत्री एजाज अहमद शाह यांनी दहशतवादी संघटना जमात उद दावावर अब्जावधी रुपये उधळल्याचे कबुल केले होते. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सरकारने दहशतवाद्यांवर अब्जावदी रुपये उडविले कारण ते मुख्य प्रवाहात रहावेत. ते सरकारच्याच इशाऱ्यावर अफगाणिस्तानमध्ये लढले होते. यामुळे त्यांची जबाबदारी होती की या दहशतवाद्यांना नोकरी आणि पैसे देण्याची.  

याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रीय असल्याची कबुली दिली होती. 'पाकिस्तानात 30 ते 40 हजार दहशतवादी आहेत. या दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर ते अफगाणिस्तान, काश्मीरमध्ये सक्रीय होतात', असं खान म्हणाले होते. आधीच्या सरकारांनी दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नव्हती. मात्र आपल्या सरकारनं दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केल्याचा दावा त्यांनी केला होता. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाAfghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादी