शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाघा सीमेवर स्फोटात ५२ ठार

By admin | Updated: November 3, 2014 04:08 IST

पाकिस्तानात वाघा सरहद्दीवर रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या शक्तीशाली आत्मघाती हल्ल्यात ५२ जण ठार, तर २०० जण जखमी झाले

वाघा सरहद्द (पाकिस्तान) : पाकिस्तानात वाघा सरहद्दीवर रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या शक्तीशाली आत्मघाती हल्ल्यात ५२ जण ठार, तर २०० जण जखमी झाले. वाघा सरहद्दीवर रेंजर्सचा ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहिल्यानंतर लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोराने या ठिकाणाहून बाहेर पडण्याच्या दरवाज्याजवळ जात स्वत:ला स्फोटाने उडविले. मृतांमध्ये ११ महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी अल-कईदा या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेल्या जनदऊल्लाह या संघटनेने स्वीकारली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे पोलीस महानिरीक्षक मुश्ताक सुखेरा यांनी सांगितले की, दररोज नेहमीप्रमाणे ध्वज उतरविण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक गर्दी करतात. रविवारी हा कार्यक्रम पाहून लोक परतत असताना आत्मघाती हल्लेखोर एकाप्रवेशद्वाराजवळ पोहोचला आणि त्याने स्फोट करून स्वत:ला उडविले. मृतांमध्ये तीन पाकिस्तानी रेंजसचा समावेश आहे. मुहर्रमच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी रेंजर्सनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली होती; परंतु, आत्मघाती बॉम्बर शोधणे कठीण असते, असे सुखेरा यांनी सांगितले.आधीच्या वृत्तात हा सिलिंडरचा स्फोट असावा, असे सांगण्यात आले होते. आमच्या पथकांनी हा आत्मघाती स्फोट असल्याचे सांगितले. या स्फोटासाठी ५ किलो स्फोटके वापरण्यात आली. हल्लेखोर परेड मैदानाच्या दरवाजाजवळ थांबला. लोक या दरवाजाजवळ जमल्यानंतर त्याने स्फोट केला. पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या वाघा सीमेवरील चौकीनजीकच्या रेस्टॉरन्टच्या बाहेर बॉम्बस्फोट झाला. घटनास्थळी बॉलबेअरिंग्ज सापडल्याचे अन्य एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून जखमींना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत.सर्व २०० जखमींना लाहोरमधील विविध इस्पितळात हलविण्यात आल्याचे घुरकी इस्पितळच्या एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले. (वृत्तसंस्था)