शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

एका तासात लावली ५० हजार झाडे

By admin | Updated: June 7, 2015 23:08 IST

भूतानसारख्या देशाने पर्यावरण दिनानिमित्त ५० हजार झाडे लावली असून, त्याची नोंद गिनीज बुकात करण्यात आली आहे.

थिम्पू : नुकत्याच झालेल्या पर्यावरणदिनी विविध देशांनी विविध उपक्रम पार पाडले. बहुतांश जणांनी वाढलेल्या उष्णतेवर लेख लिहीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. पण भूतानसारख्या देशाने पर्यावरण दिनानिमित्त ५० हजार झाडे लावली असून, त्याची नोंद गिनीज बुकात करण्यात आली आहे. येथील १०० लोकांनी एका तासात ५० हजार झाडे लावली आहेत. भूतानचे राजे जिग्मे सिग्मे वांगचूक हे पर्यावरणप्रेमी आहेत.तेथील राज्यघटनेनुसार देशातील ६० टक्के भागात वने असलीच पाहिजेत. पर्यावरणप्रेमी राजाचा ६० वा वाढदिवस आणि पर्यावरण दिन असा मुहूर्त साधत भूतानचा कृषी व वन विभाग व राजाच्या षट्यब्दीपूर्तीसाठी नागरिकांच्या पिक्सा या संस्थेतर्फे विश्वविक्रमी झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी १०० नागरिकांनी एकत्र येऊन एका तासात ४९ हजार ६७२ झाडे लावली. याआधी आसाममध्ये एका तासात ४० हजार ८८५ झाडे लावण्यात आली होती. या वृक्षारोपणामुळे ड्यूक ग्यालपो जिग्मे सिग्मे वांगचूक व भूतानचे पाचवे राजे जिग्मे ख्येसर नामग्याल वांगचूक यांच्यासह प्रत्येक नागरिकाला तुमचा अभिमान वाटत आहे, असे भूतानच्या राजमाता दोरजी वाग्मो वांगचूक यांनी म्हटले आहे. वृक्षारोपणाचा हा उपक्रम पिक्साचे कर्मा शेरिंग यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. हा विक्रम कोणी मोडला तर आम्ही तो पुन्हा नव्याने प्रस्थापित करू असे त्यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)