वॉशिंग्टन : जगात सर्वत्र आज पहिला योग दिन साजरा होत आहे; पण अमेरिकेतील दोन कोटींपेक्षा जास्त लोक आधीपासूनच योगासने करीत असून, यामुळे देशात २७ अब्ज डॉलरचा व्यापार सुरू आहे. अमेरिकेत २००८ साली १.५८ कोटी लोक योगासने करीत असत, ती संख्या वाढून आता २.०४ कोटी झाली आहे. योगानिमित्त होणारा व्यवसायही वाढता असून, अमेरिकन लोक योगासाठी लागणारे कपडे व इतर गोष्टींसाठी ११ अब्ज डॉलर खर्च करतात. २००९ च्या तुलनेत ही रक्कम ८८ टक्के अधिक आहे. योग करणारांची संख्या वाढत असून, अमेरिकेत विक्रम, अष्टांग व विन्यास योग स्टुडिओ आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}