शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अमेरिकेच्या तळांवर डागली 22 क्षेपणास्रे, 80 सैनिकांचा मृत्यू, इराणचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 1:35 PM

मंगळवारी संध्याकाळी सुलेमानी यांना 'सुपुर्द ए खाक' केल्यानंतर इराणने त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेच्या इराकमधील तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे जोरदार हल्ला केला.

तेहरान - इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेला तणाव आता संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. मंगळवारी संध्याकाळी सुलेमानी यांना 'सुपुर्द ए खाक' केल्यानंतर इराणने त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेच्या इराकमधील तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे जोरदार हल्ला केला होता. दरम्यान, अमेरिकेच्या तळांवर एकूण 22 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यात 80 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणने केला आहे. मंगळवारी रात्री इराणने क्षेपणास्रांद्वारे हल्ला करत अमेरिकेच्या इराकमधील तळांना लक्ष्य केले होते. दरम्यान, इराणकडून क्षेपणास्रांद्वारे अमेरिकेच्या तळांवर हल्ले झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेकडून दुजोरा देण्यात आला आहे. तसेच या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत पेंटागॉनकडून माहिती घेतली जात आहे. अमेरिकेनं गेल्या आठवड्यात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे कमांडर कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला होता. सुलेमानी यांच्या हत्येचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यावेळी इराणने अमेरिकेला दिला होता. यानंतर आता इराणने अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. दरम्यान, इराणच्या या कारवाईमुळे इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Iranइराणqasem soleimaniकासीम सुलेमानीUnited Statesअमेरिका