13th BRICS Summit : अफगाणिस्ताननं शेजारील देशांसाठी धोका बनू नये; पुतीन यांचा तालिबानला थेट इशारा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:07 PM2021-09-09T20:07:36+5:302021-09-09T20:09:58+5:30

रशियाची ही टिप्पणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण तालिबानला मॉस्कोचे समर्थन असल्याच्या बातम्या आल्या आहेत. याशिवाय, चीनची भूमिकाही तालिबानच्याच बाजूने दिसते. पाकिस्तान तर उघडपणे तालिबानचे समर्थन करत आहे. अशा परिस्थितीत पुतीन यांच्या या कठोर टिप्पणीचे मोठे परिणाम होऊ शकतात. 

13th brics summit Afghanistan should not become a threat to its neighbouring countries says president vladimir putin | 13th BRICS Summit : अफगाणिस्ताननं शेजारील देशांसाठी धोका बनू नये; पुतीन यांचा तालिबानला थेट इशारा! 

13th BRICS Summit : अफगाणिस्ताननं शेजारील देशांसाठी धोका बनू नये; पुतीन यांचा तालिबानला थेट इशारा! 

Next

नवी दिल्ली - अफगाणिस्तानने आपल्या शेजारील देशांसाठी धोका बनू नये. त्यांनी शेजाऱ्यांसाठी दहशतवाद आणि ड्रग्स तस्करीसारखा धोका निर्माण करू नये, असे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. ते 13 व्या ब्रिक्स शिखर सम्मेलनात  बोलत होते. (13th brics summit Afghanistan should not become a threat to its neighbouring countries says president vladimir putin)

पुतिन म्हणाले, अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांनी आपले सैन्य परत घेतल्यानंतर अफगाणिस्तान संकटात सापडला आहे. याचा जगाच्या आणि प्रदेशाच्या सुरक्षिततेवर कसा परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आपण सर्व देशांनी या समस्येकडे विशेष लक्ष दिले आहे.

रशियाची ही टिप्पणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. कारण तालिबानला मॉस्कोचे समर्थन असल्याच्या बातम्या आल्या आहेत. याशिवाय, चीनची भूमिकाही तालिबानच्याच बाजूने दिसते. पाकिस्तान तर उघडपणे तालिबानचे समर्थन करत आहे. अशा परिस्थितीत पुतीन यांच्या या कठोर टिप्पणीचे मोठे परिणाम होऊ शकतात. 

AK-47च्या धाकानं धावणार अर्थव्यवस्था? तालिबान सरकारमध्ये हा दहशतवादी झाला सेंट्रल बँकेचा प्रमुख

पंतप्रधान मोदींनीही केलं दहशतवादविरोधी अॅक्शन प्लॅनचं कौतुक -
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13व्या ब्रिक्स शिखर सम्मेलनाचे अध्यक्ष होते. मोदी म्हणाले, नुकतेच पहिले “ब्रिक्स डिजिटल आरोग्य सम्मेलन” आयोजित करण्यात आले होती. तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने ही एक अभिनव सुरुवात आहे. नोव्हेंबर महिन्यात आमचे जलसंपदा मंत्री ब्रिक्स फॉर्म्याटमध्ये पहिल्यांदाच भेटतील. आम्ही ब्रिक्स 'काउंटर टेररिझम अॅक्शन प्लॅन' (Counter Terrorism Action Plan) अर्थात दहशतवादविरोधी अॅक्शन प्लॅनचेही सर्थन केले आहे.
 

Web Title: 13th brics summit Afghanistan should not become a threat to its neighbouring countries says president vladimir putin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.