Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'

Rohit Sharma Shubman Gill Story: रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 05:22 PM2024-06-16T17:22:59+5:302024-06-16T17:26:47+5:30

whatsapp join usJoin us
Shubman Gill shares Instagram story with Rohit Sharma gives clear message that all is well between Team India amid rumours | Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'

Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rohit Sharma Shubman Gill Story: शुभमन गिलने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून रोहित शर्मासोबतच्या वाद असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम दिला आहे. गिलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. त्यामध्ये तो रोहित शर्मासोबत दिसत आहे. शुबमन गिलला शिस्तभंगामुळे भारतीय स्क्वॉडमधून काढून टाकण्यात आले आहे आणि त्याला मायदेशी परतण्यास सांगितले आहे, असा दावा काही प्रसारमाध्यमांतून करण्यात आला होता. त्यामुळे रोहित-गिल यांच्यात अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण त्याच दरम्यान गिलने स्टोरी पोस्ट करून चर्चांना पूर्णविराम दिला.

गिल सध्याच्या T20 विश्वचषकात भारतीय संघात राखीव खेळाडू आहे. अमेरिका दौऱ्यात गिलच्या वागण्यावर संघ व्यवस्थापन खूश नसल्याची चर्चा होती. यादरम्यान, शुभमन गिलने रोहित शर्मा आणि त्याची मुलगी समायरा सोबतचा एक फोटो शेअर केला. एका फोटोत गिल फक्त रोहित शर्मासोबत आहे तर दुसऱ्या फोटोत तो रोहित आणि समायरासोबत आहे. या स्टोरीमध्ये शुबमन गिलने लिहिले आहे की, 'सॅमी (समायरा) आणि मी रोहित शर्माकडून शिस्तीचे धडे घेत आहोत.'

गेल्या काही दिवस अशी चर्चा रंगली होती की, आवेश खान आणि शुभमन गिल अमेरिकेतून परततील आणि वेस्ट इंडिजला जाणार नाहीत. त्यांना वर्ल्ड कप सोडून घरी जाण्यास सांगितले आहे. अमेरिकेतील या घडामोडीबाबत एका सूत्राने सांगितले की शिस्तभंगाची कोणतीही कारवाई झालेली नाही. संघ व्यवस्थापन गिलवर अजिबात नाराज नाही. तसेच गिलने रोहितला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचीही केवळ अफवाच आहे. आता शुभमन गिलने रोहितसोबतचा एक फोटो शेअर करून सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.

Web Title: Shubman Gill shares Instagram story with Rohit Sharma gives clear message that all is well between Team India amid rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.