शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये १०९ नवे कोरोना रुग्ण, दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत केले तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 02:38 IST

चीनने हेबेई प्रांतातील नॅनगोंग शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे रुग्णांसाठी १५०० खोल्यांचे रुग्णालय पाच दिवसात शनिवारी बांधून पूर्ण केले. नॅनगोंग शहरातील सहा रुग्णालयांपैकी हे एक रुग्णालय आहे.

बीजिंग : चीनमधील हेबेई प्रांतात रविवारी कोरोनाचे १०९ रुग्ण आढळून आल्याने त्या देशात पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. चीनमध्ये आठ महिन्यांनंतर जानेवारीत कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. चीनमध्ये गेल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत.कोरोनाच्या उगमस्थानाचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे एक पथक चीनमध्ये पाठविले आहे. नेमके त्याचवेळी या साऱ्या घटना घडत आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, हेबेई प्रांतातील १०९ नव्या कोरोना रुग्णांपैकी ९६ जणांना स्थानिक स्तरावर संसर्ग झाला. 

आईस्क्रीममध्ये आढळला कोरोना विषाणू -चीनच्या आईस्क्रीममध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या आईस्क्रीमच्या उत्पादक कंपनीला आता सील ठोकण्यात आले आहे. कोरोना साथीचे उगमस्थान शोधण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक चीनमध्ये दाखल झालेले आहे. नेमके त्याचवेळेला चीनमध्ये ही घटना घडली. बीजिंगजवळ असलेल्या तिआनजिन या भागामध्ये दाक्विआओदाओ फूड कंपनी असून तिने बनविलेल्या आईस्क्रीममध्ये कोरोनाचा विषाणू आढळला. या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. या आईस्क्रीममुळे कोणाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे अजून तरी समोर आलेले नाही. आईस्क्रीम गेल्या काही दिवसांत कोणाला विकले गेले, याची माहिती घेतली जात आहे.दीड हजार खोल्यांचे रुग्णालय ५ दिवसांत -चीनने हेबेई प्रांतातील नॅनगोंग शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे रुग्णांसाठी १५०० खोल्यांचे रुग्णालय पाच दिवसात शनिवारी बांधून पूर्ण केले. नॅनगोंग शहरातील सहा रुग्णालयांपैकी हे एक रुग्णालय आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर