शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक 8 मुलींपैकी एकीवर होतात लैंगिक अत्याचार; ‘युनिसेफ’च्या अहवालातील भयंकर वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 06:51 IST

ऑनलाइन छळ तसेच अन्य अत्याचारांची गणना केल्यास पीडित मुलींची संख्या ६५ कोटींच्या घरात जाईल, असे यात म्हटले आहे. यामुळे जगभरात बाल अधिकारांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणास सुरु आहे, हे समोर आले आहे. (वृत्तसंस्था)

जिनिव्हा : जगातील तब्बल ३७ कोटी अल्पवयीन मुलींना वयाची अठरा वर्षे पूर्ण होण्याआधी एकदातरी बलात्कार, लैंगिक अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे, असे भयंकर वास्तव ‘युनिसेफ’ने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर दर आठ मुलींमागे एका मुलीला या भयंकर अनुभवाचा सामना करावा लागला आहे. 

ऑनलाइन छळ तसेच अन्य अत्याचारांची गणना केल्यास पीडित मुलींची संख्या ६५ कोटींच्या घरात जाईल, असे यात म्हटले आहे. यामुळे जगभरात बाल अधिकारांचे उल्लंघन किती मोठ्या प्रमाणास सुरु आहे, हे समोर आले आहे. (वृत्तसंस्था)

अत्याचार मुलांवरही : अल्पवयीन मुलीच नव्हे तर मुलेही लैंगिक अत्याचाराचे बळी ठरले आहेत. जगभरात तब्बल २४ कोटी मुलांनी बालवयात या अत्याचारा भयंकर अनुभव घेतला आहे. ऑनलाइन छळ, बॅड टच आदी गैरप्रकारांचा गणना केल्यास जगभरातील पीडित मुलांची संख्या ५३ कोटीपर्यंत आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

अत्याचाराचे घाव राहतात आयुष्यभर दीर्घकाळ लैंगिक अत्याचारामुळे पीडित व्यक्ती मानसिक दृष्टीने पूर्णपणे खचून जाते. अनेक प्रकारचे आजार जडू शकतात. यामुळे त्यांना चिंता, ताण आणि अनेक मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. यातून बाहेर पडण्यासाठी पीडित ड्रग्जचा आसरा घेतात.पीडित व्यक्तीला सामान्यपणे जीवन जगणे कठीण होऊन बसते. झालेल्या अत्याचाराबाबत पीडित व्यक्तीने कुठेही वाच्यता न केल्यास मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम होण्याची भीती असते. 

कोणत्या वयात होतात सर्वाधिक अत्याचार? - लैंगिक अत्याचाराची सुरुवात किशोरावस्थेतच होते. १४ ते १७ या वयाच्या टप्प्यात लैंगिक अत्याचार होण्याची शक्यता अधिक असते. - यामुळे पीडित मुलींचे शारिरीक तसेच मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते. - राजकीय संघर्षातून अस्थिरतेने ग्रस्त प्रदेशात तसेच तात्पुरत्या उभारलेल्या शरणार्थी शिबिरांमध्ये असे अत्याचार होण्याची शक्यता अधिक असते. - शरणार्थी शिबिरांमधील दर चार मुलींमागे एक मुलगी लैंगिक अत्याचाराची बळी ठरलेली आहे, असे हा अहवाल सांगतो. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषण