Asian Games 2018: भारताचा पाकिस्तानवर विजय; हॉकीमध्ये कांस्यपदकाची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 17:25 IST2018-09-01T17:24:58+5:302018-09-01T17:25:25+5:30

कांस्यपदकाच्या लढतीत भारताने पाकिस्तानवर 2-1 अशी मात केली.

Asian Games 2018: India's victory over Pakistan; Bronze medal in hockey | Asian Games 2018: भारताचा पाकिस्तानवर विजय; हॉकीमध्ये कांस्यपदकाची कमाई

Asian Games 2018: भारताचा पाकिस्तानवर विजय; हॉकीमध्ये कांस्यपदकाची कमाई

ठळक मुद्दे भारताकडून अक्षदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केले.

जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताने पारंपिरक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पुरुष हॉकीमध्ये दमदार विजय मिळवला. कांस्यपदकाच्या लढतीत भारतानेपाकिस्तानवर 2-1 अशी मात केली. भारताकडून अक्षदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केले.



 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला अक्षदीप सिंगने गोल केला आणि भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर भारताने काहीसा सावध पवित्रा घेतला आणि पाकिस्तानला गोल करण्यापासून रोखले. त्यामुळे पहिल्या सत्रात भारताने 1-0 अशी आघाडी कायम ठेवली होती.


भारताने 1-0 अशी आघाडी दुसऱ्या सत्रातही कायम राखली. 


तिसऱ्या सत्रात पुन्हा एकदा भारताने जोरदार आक्रमण लगावले. सामन्याच्या 50व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने भारतासाठी दुसरा गोल केला आणि आघाडी दुप्पट केली.


भारताने दुसरा गोल केल्यानंतर दोन मिनिटांमध्येच पाकिस्तानने जोरदार आक्रमण लगावले. या आक्रमणाचा त्यांना चांगलाच फायदा झाला. भारताचा बचाव भेदत त्यांनी 52व्या मिनिटाला पहिला गोल केला. पाकिस्तानच्या मोहम्मद अतिकने देशासाठी पहिला गोल करत आपले आव्हान कायम राखले.


Web Title: Asian Games 2018: India's victory over Pakistan; Bronze medal in hockey