शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यापैकी सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यात ...

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यापैकी सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यात पाच परभणी जिल्ह्यातील तर हिंगोली जिल्ह्यात दोन जागा आहेत. हिंगोलीत आ. तानाजी मुटकुळे हे बिनविरोध आले होते. तर, सेनगावमध्ये राजेंद्र देशमुख यांचा अर्ज अवैध ठरल्याने माजी आ. साहेबराव पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यात मतदान होणार आहे. शिवाय इतर मागास, महिला, भटक्या विमुक्त आदी प्रवर्गांच्या उमेदवारांसाठी सर्वच तालुक्यांमध्ये मतदान होणार आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेकांची लगबग दिसत होती. शेवटच्या टप्प्यातही सहलीवर न गेलेल्या मतदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू होता. या निवडणुकीत आ. सुरेश वरपूडकर व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटात रस्सीखेच दिसत आहे. काही ठिकाणी निवडणुकीला पक्षीय झालर असली, तरी काही ठिकाणी मात्र संबंधावर भर असल्याचे दिसत आहे. त्यातच लक्ष्मीअस्त्र प्रभावी ठरणार असून मतदारसंख्या कमी असल्याने चांगलाच भाव चढलेला दिसत आहे. यात अनेक जण एकासोबत सहलीवर गेल्यानंतरही दुसऱ्या उमेदवाराच्या संपर्कात असल्याचा प्रकारही दिसून येत आहे. त्यामुळे जास्त मतदार सहलीवर नेल्यानंतर आपण सेफ झाल्याची भावना बाळगणाऱ्यांनाही मतदानाचा निकाल समोर येईपर्यंत याच भ्रमात राहावे लागणार असल्याचे दिसत आहे. २३ मार्च रोजी मतमोजणी असून याच दिवशी सगळे कळणार आहे.