जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:28 IST2021-04-11T04:28:56+5:302021-04-11T04:28:56+5:30

जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून ढगाळ वातावरण दिसून येत होते. रात्रीच्या वेळी उकाडा ही जाणवत होता. त्यानंतर १० एप्रिल रोजी ...

Untimely rain with strong winds in the district | जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून ढगाळ वातावरण दिसून येत होते. रात्रीच्या वेळी उकाडा ही जाणवत होता. त्यानंतर १० एप्रिल रोजी सकाळपासून उन्हाचा पारा वाढला होता. मात्र दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. रिमझिम पावसासह जोराचा वारा ही असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. हिंगोली तालुक्यातील फाळेगाव,कनेरगाव नाका, सेनगाव तालुक्यातील कडोळी, हिंगोली शहरासह बासंबा, बळसोंड परिसरात काही वेळ अवकाळी पावसाने हजेरी लावली. कनेरगाव, फाळेगाव शिवारात जोराचा वारा ही वाहत होता. तर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. या पावसाने थोडासा गारवा जाणवत असला तरी त्यानंतर उकाडा जाणवायला सुरूवात झाली होती. दरम्यान, १० एप्रिल रोजी जिल्ह्यातील कमाल तापमान ३७ अंश नोंदविले गेले. मागील आठवड्यात ४१ अंशापर्यंत कमाल तापमान गेले होते.

Web Title: Untimely rain with strong winds in the district