शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दोन हजार लाभार्थ्यांना मिळाले हक्काचे घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:28 AM

हिंगोली : जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आवास योजनेंतर्गत घरकूल उपलब्ध करून देण्यात येते. ...

हिंगोली : जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आवास योजनेंतर्गत घरकूल उपलब्ध करून देण्यात येते. फेब्रुवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील २ हजार १८८ लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना हक्काचे पक्के घर उपलब्ध व्हावे, त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मिटावा, यासाठी शबरी घरकूल योजना मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यात २०१६-१७ ते २०२०-२१ या काळात २ हजार ९८३ घरकुले बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकूल बांधकामासाठी पुढाकार घेण्यात आला होता. त्यानुसार, फेब्रुवारी, २०२१ पर्यंत जिल्ह्यातील २ हजार १८८ लाभार्थ्यांनी घराचे बांधकाम पूर्ण केले आहे, तर २ हजार ७१३ लाभार्थ्यांना अनुदानाचा पहिला हप्ता देण्यात आला. २ हजार ३२३ लाभार्थ्यांना दुसरा, २ हजार ११९ लाभार्थ्यांना तिसरा तर १ हजार १९५ लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा हप्ता देण्यात आला आहे. आता केवळ ७९५ घरकुलाची कामे अपूर्ण आहेत.

कळमनुरी तालुक्याला सर्वाधिक उद्दिष्ट

जिल्ह्याला शबरी योजनेंतर्गंत २ हजार ९८३ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात औंढा नागनाथ तालुक्यासाठी ६५० घरकुले बांधकामाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ४५३ घरकुले पूर्ण झाली आहेत. वसमत २४४ पैकी २०३, हिंगोली २०७ पैकी १६४, कळमनुरी १ हजार ६५० पैकी १ हजार २१९, तर सेनगाव २३२ पैकी १४९ घरकुलांची बांधकामे पूर्ण झाली आहेत.