टाळेबंदीमध्ये व्यापाऱ्यांना सूट द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:30 IST2021-04-01T04:30:22+5:302021-04-01T04:30:22+5:30

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची टाळेबंदी लागू केली आहे. परंतु, गुमास्ता, हमाल व कामगारांचे ...

Traders should be exempted from lockout | टाळेबंदीमध्ये व्यापाऱ्यांना सूट द्यावी

टाळेबंदीमध्ये व्यापाऱ्यांना सूट द्यावी

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने सात दिवसांची टाळेबंदी लागू केली आहे. परंतु, गुमास्ता, हमाल व कामगारांचे हाल होत आहे. हे पाहून टाळेबंदीमध्ये थोडी सूट द्यावी, अशी मागणी व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी जयवंशी यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीला १ ते ७ मार्चदरम्यान टाळेबंदी लागू केली होती. त्यानंतर कोरोना रुग्ण कमी होण्याऐवजी वाढू लागल्याने २६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान पुन्हा टाळेबंदी लागू केली आहे. व्यापाऱ्यांचे दुकाने उघडे राहिले तरच कामगार, गुमास्ता आणि हमालांचे घर संसार चालू शकतो. नसता त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते, असे व्यापारी महासंघाचे निवेदनात म्हटले आहे. सात-सात दिवस दुकाने बंद राहिले तर हमाल, कामगार व गुमास्तांनी काय खावे? असेही निवेदनात म्हटले आहे. टाळेबंदीमुळे गोरगरीबांचे तर हाल होतच आहेत. त्याचबरोबर व्यापाऱ्यांचेही नुकसान होत आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गोष्टीचा विचार करुन व्यापारांमध्ये थोडी सूट द्यावी, अशी मागणी ३१ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनावर हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गजानन घुगे, कोषाध्यक्ष सुदर्शन कंदी, सचिव प्रकाशचंद सोनी, कार्याध्यक्ष रमेशचंद बगडीया, शहर कार्याध्यक्ष सुधीरअप्पा सराफ, शहर सचिव आनंद निलावार, शहर अध्यक्ष पंकज अग्रवाल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो नं. २८

Web Title: Traders should be exempted from lockout