तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा ऑनलाइन कामावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:33 IST2021-03-09T04:33:10+5:302021-03-09T04:33:10+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आश्वासनानंतरही लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे ९ मार्चपासून ...

Talathi, Mandal officials boycott online work | तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा ऑनलाइन कामावर बहिष्कार

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचा ऑनलाइन कामावर बहिष्कार

हिंगोली : जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आश्वासनानंतरही लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे ९ मार्चपासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट राज्य तलाठी संघाने घेतला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना संघटनेच्या वतीने दिले आहे.

जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने करण्यात आली. त्या अनुषंगाने कामकाज बंद करून आंदोलनही करण्यात आले होते. त्यावेळी फेब्रुवारीअखेर लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून दिले जाईल, असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत लॅपटॉप व प्रिंटर देण्यात आले नाही. त्यामुळे ९ मार्चपासून डिजिटल सिग्निचर जमा करून ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

या संदर्भात संघटनेच्या वतीने साेमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर संघटनेचे विभागीय मराठवाडा अध्यक्ष स.आयुब. स. रसुल, जिल्हाध्यक्ष विनोद ठाकरे, सरचिटणीस विनायक किन्होळकर यांच्यासह तलाठ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Talathi, Mandal officials boycott online work