शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल १३ वर्षांपासून बंद(टिप- कृपया बोल्ड केलेली वाक्ये पाहा. लिंक लागत नाहीए.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

हिंगोली : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी सिग्नल चार ते पाच ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले, परंतु सद्य:स्थितीत सिग्नल ...

हिंगोली : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी सिग्नल चार ते पाच ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले, परंतु सद्य:स्थितीत सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांवर ताण येत आहे. सिग्नल बसविले, त्यानंतर काही वर्षे सुरू होते, परंतु नंतर सिग्नल का बंद पडले, हा आता संशोधनाचा विषय बनला आहे.

१ मे, १९९९ रोजी झाला आहे. अनेक नवनवीन कार्यरत जिल्ह्यात झाली आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था वाढू लागली आहे. २००९ मध्ये शहरातील अग्रसेन चौक, इंदिरा चौक, गांधी चौक, नगर पालिका, रेल्वे उड्डाण पूल आदी ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले, परंतु हे सिग्नल कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आले आहेत, ते का सुरू करण्यात येते नाहीत, असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांसमोर आहेत. सिग्नल सुरू केल्यास वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन पोलिसांवरील ताण कमी होऊ शकतो. तेव्हा नगरपालिकेने बंद पथदिवे सुरू करणे आता गरजेचे होऊन बसले आहे. काही वाहनचालक तर पोलिसांसमोर विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचे धाडस करतात. अशा वेळी मात्र त्या वाहनचालकांना पोलिसांचा दंडुका खावा लागतो.

वाहनचालक काय म्हणतात?

शहरात महावीर चौक ते गांधी चौक हा एकच रस्ता मोठा आहे. बाकी सर्व रस्ते अरुंदच आहेत. विरुद्ध दिशेने आल्यास वाहतूक शाखेकडून दंडाचा मॅसेज लगेच येतो. अशा वेळी खूप विचार करणे भाग पडते.

-गजानन मगर, वाहनचालक

शहरातील सिग्नल सुरू करणे गरजेचे आहे. सिग्नल सुरू केल्यास वाहतुकीचे नियम कळू लागतात. हिंगोली हे मोठे शहर नसले, तरी नियम तर चोहीकडे सारखेच आहेत. वाहतूक नियम माहिती नसल्यामुळे एखादे वेळी चुकून वाहन विरुद्ध दिशेने जाते. यावेळी मात्र पोलिसांची पावती फाडावी लागते. कधी-कधी मोबाइलवर फोटो काढून त्याची पावती व दंड मॅसेजद्वारे येत असतो.

- मंगेश महाजन, वाहनचालक

सिग्नल बंद असल्यामुळे पोलिसांवर वाढला ताण

सिग्नल बंद असल्यामुळे काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने वाहने चालवितात. अशा वेळी वाहन चालकावर दंडाची कार्यवाही करावी लागते. कधी-कधी मोर्चा जर मुख्य रस्त्याने जात असेल, तर मोठी कसरत पोलिसांना करावी लागते. परिणामी, पोलिसांवर ताण येऊन पडतो.