वायचाळ पिंपरी येथे रेती साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:31 IST2021-04-09T04:31:58+5:302021-04-09T04:31:58+5:30

वायचाळ पिंपरी येथील पैनगंगा नदीच्या पात्रातून मागील एक ते दीड महिन्यापासून रेती चोरीचा प्रकार होत असल्याची तक्रार धम्मानंद ...

Sand stocks seized at Vaichal Pimpri | वायचाळ पिंपरी येथे रेती साठा जप्त

वायचाळ पिंपरी येथे रेती साठा जप्त

वायचाळ पिंपरी येथील पैनगंगा नदीच्या पात्रातून मागील एक ते दीड महिन्यापासून रेती चोरीचा प्रकार होत असल्याची तक्रार धम्मानंद भगत यांनी ग्रामपंचायत कार्यालय वायचाळ पिंपरी व सवना सज्जा तलाठी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्यावरून तलाठी यांनी पैनगंगा नदीमध्ये पाहणी केली असता ६ एप्रिल रोजी नदीजवळील असलेल्या वायचाळ पिंपरी शेत-शिवार गट नंबर ४३८ मध्ये रेती साठा आढळून आला आहे. सदरील रेती साठा जप्त करण्यात आला आहे. हा रेतीसाठी अंदाजे ९ ते १० ब्रास असून याचा पंचनामा करण्यात आला. सदरील शेत मालकांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वीचा रेती साठा असून घर बांधण्याकरिता रेती जमा केली आहे. या पंचनामा दरम्यान धम्मानंद भगत, अंकुश पवार, पंडित देवकर, अंकुश सातकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. फोटो नं. ८

Web Title: Sand stocks seized at Vaichal Pimpri