शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

औंढा- परभणी रस्त्यावर नळाच्या लिकेजमुळे रस्त्याचे काम थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:30 IST

औंढा नागनाथ : शहरात रस्ता रुंदीकरणातून होत असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, मधोमध खासगी नळाचे पाणी ...

औंढा नागनाथ : शहरात रस्ता रुंदीकरणातून होत असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, मधोमध खासगी नळाचे पाणी लिकेज होत असून याबाबत वारंवार सांगूनही दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे गुत्तेदाराने दोन ठिकाणी काम बंद केले आहे. यामुळे रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे. या प्रकारामुळे नगरपंचायतने संबंधित नळ कनेक्शनधारकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

औंढा नागनाथ हे जोतिर्लिंगचे ठिकाण असल्याने नावीन्यपूर्ण योजनेतून जिंतूर-औंढा-झीरो फाटा ते पिंपळदरी फाट्यापर्यंत रस्ता रुंदीकरण व सुशोभिकरण होत आहे. पहिल्या टप्प्यातील काम झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात असलेले विश्रामगृह ते जुने बसस्थानकपर्यंतच्या रस्त्याचे काम सिमेंट काँक्रिटमध्ये होत आहे. दोन्ही बाजूंनी रॉडमधून दुभाजक त्यात लाईट व सुशोभित झाडे लावण्यात येणार आहे.

सध्या हे काम प्रगतीपथावर असून अशातच ढाब्यासमोर खासगी नळ कनेक्शन आहे. मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमधून नळाचे पाणी लिकेज होत आहे. तसेच नवीन बसस्थानकसमोरील रस्त्यावरही मुख्य पाईपलाईनमधून अनेक खासगी हॉटेलचालकांनी नळ घेतला आहे. सदरील नळातून अनेकवेळा पाणी लिकेज होत आहे. अनेकवेळा नगरपंचायतने यावर काम करून पाणी बंद केले होते. शिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनेदेखील पाणी लिकेज बंद करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, सदरील कनेक्शन खासगी असल्याने तेवढ्या गांभीर्याने घेतले जात नाही. त्यामुळे सतत पाणी लिकेजमुळे सिमेंट काँक्रिटचे काम करता येत नसल्यामुळे तेवढ्यापुरता रस्त्याचे काम बंद केले आहे. त्यामुळे हा रस्ता पूर्ण होऊनदेखील अपूर्णच राहणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

... तर दंड आकारण्यात येईल

आम्ही सदरील दुरुस्ती वेळोवेळी करून दिली आहे. परंतु, खासगी हॉटेलचालक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यांनी तत्काळ ही दुरुस्ती करून नाही घेतल्यास त्यांच्यावर योग्य तो दंड आकारण्यात येणार आहे.

- सचिन जैस्वाल, मुख्याधिकारी

फोटो नं. ५