खासगीच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती मागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:28 AM2021-04-10T04:28:59+5:302021-04-10T04:28:59+5:30

हिंगोली जिल्ह्याची २०१८ ते १९ या वर्षाची शिक्षकेतरची संचमान्यता मंजूर झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १२ ते १५ कर्मचारी अतिरिक्त ...

Requested information on additional private employees | खासगीच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती मागविली

खासगीच्या अतिरिक्त कर्मचाऱ्यांची माहिती मागविली

Next

हिंगोली जिल्ह्याची २०१८ ते १९ या वर्षाची शिक्षकेतरची संचमान्यता मंजूर झाली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १२ ते १५ कर्मचारी अतिरिक्त ठरण्याचा अंदाज शिक्षण विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तर जिल्ह्यात यानुसार रिक्त पदे ४८ ते ५२ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनुज्ञेय रिक्त पदे असल्यास अतिरिक्त ठरणाऱ्या कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, मुख्य लिपिक, प्रयोगशाळा सहायकांची पदे अतिरिक्त ठरलेली असल्यास त्यांचे संस्थेअंतर्गत समायोजन करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तर शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरत असल्यास व पद रिक्त नसल्यास त्याची वैयक्तिक माहिती जिल्हा स्तरावर समायोजनासाठी संस्थेअंतर्गत असलेल्या शाळांतील रिक्त पदांची माहिती १२ एप्रिलपर्यंत सादर करण्यास आदेशित केले आहे. यात विलंब झाल्यास संस्था व मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल, असे म्हटले आहे.

ग्रंथपाल आणि सेवकाबाबत शासनाने अजून आदेश दिले नाहीत. त्यामुळे या दोन पदांचे समायोजन करण्यात येऊ नये, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार असून, तूर्त इतर कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्यास सांगितले आहे.

Web Title: Requested information on additional private employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.