शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

एसएमएसद्वारे वीज बिलावर ‘पत्ता’ दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:24 IST

महावितरणच्या वतीने राज्यभरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी वीजबिलावरील ग्राहकांच्या पत्त्याची दुरुस्तीसाठी अधिकृत मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करता येणे सहज सोपे झाले असून मागील दोन दिवसांत राज्यातील सुमारे ५२ हजार ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महावितरणच्या वतीने राज्यभरातील ग्राहकांच्या सुविधेसाठी वीजबिलावरील ग्राहकांच्या पत्त्याची दुरुस्तीसाठी अधिकृत मोबाईल नोंदणी केलेल्या ग्राहकांना एसएमएस पाठविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना बिलावरील पत्त्याची दुरुस्ती करता येणे सहज सोपे झाले असून मागील दोन दिवसांत राज्यातील सुमारे ५२ हजार ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

वीजबिलावरील पत्त्याची दुरुस्ती झाल्यामुळे ग्राहकांना वेळेत बिल मिळणे, योग्य वेळेत रीडिंग घेणे या प्रक्रियेत अधिक अचूकता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनाही वेळेत वीजबिल भरुन महावितरणच्या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. राज्यात महावितरणचे सुमारे २ कोटी ५० लाखांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. त्यापैकी १ कोटी ९५ लाख ग्राहकांनी अधिकृत मोबाईलची नोंदणी महावितरणकडे केली आहे. मोबाईलवरील एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे करण्याचे आवाहन केले आहे.

नांदेड मंडळ एकूण ग्राहक - ५५६४०७,मोबाईल नोंदणी केलेले ग्राहक - ३३९८०२, परभणी मंडळ एकूण ग्राहक- २८५७४९ तर मोबाईल नोंदणी केलेले ग्राहक- १३६६६६, हिंगोली मंडळअंतर्गत एकूण ग्राहक -१८४५६३ तसेच मो. नोंदणी केलेले ग्राहकांची संख्या - १३७०५७ अशी आहे. नांदेड परिमंडळ एकूण ग्राहकांची - १०२६७१९ संख्या आहे. तर मो. नोंदणी केलेले ग्राहक - ६१३५४३ एवढे आहेत. नांदेड परिमंडळात सर्व प्रकारच्या वर्गवारीतील वीज ग्राहकांची संख्या १० लाख २६ हजार ७१९ असून त्यापैकी ६ लाख १३ हजार ५४३ वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांक महावितरणच्या प्रणालीमध्ये नोंदवले आहेत. ज्या वीज ग्राहकांनी आपला अधिकृत मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविला आहे, त्यांना एसएमएस पाठविण्यात येत आहेत. या एसएमएसवरील लिंक ओपन केल्यास त्यावर ग्राहकांचा पत्ता उपलब्ध होईल. त्या पत्त्यात दुरुस्ती करण्याची सुविधा सदर लिंकद्वारे ग्राहकांना देण्यात आली आहे. यात ग्राहकांना कुठलाही आर्थिक भार सोसावा लागणार नाही.

टॅग्स :mahavitaranमहावितरणHingoliहिंगोली