शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

बिल न देताच ‘महावितरण’ची वसुली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST

जिल्ह्यातील कृषीपंपधारक ७५ हजार ३१८ असून वीज बिल थकबाकी ११५० कोटी ४३ लाख रुपये एवढी आहे. यापैकी कृषीपंप धोरण ...

जिल्ह्यातील कृषीपंपधारक ७५ हजार ३१८ असून वीज बिल थकबाकी ११५० कोटी ४३ लाख रुपये एवढी आहे. यापैकी कृषीपंप धोरण २०२० मध्ये ६ कोटी ६९ लाख वसूल करण्यात वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांना यश आले आहे. तालुकानिहाय सांगायचे झाल्यास कळमनुरी तालुक्यात १९४ कोटी ५२ लाख, हिंगोली १६७ कोटी २४ लाख, वसमत ३६१ कोटी २४ लाख, सेनगाव २१७ कोटी ७० लाख , औंढा नागनाथ २०९ कोटी ९३ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. कृषीपंपचालकांनी ‘कृषीपंप २०२०’ या योजनेत सहभाग घेतला तर त्यांना भरपूर असा लाभ होणार आहे परंतु, मोजकेच कृषीपंपचालक यात भाग घेत आहेत. कृषीपंप योजनेत सहभाग घेतल्यास सप्टेंबर २०२५ ते सप्टेंबर २०२० यामधील विलंब आकारही माफ होणार आहे. विशेष म्हणजे ५० टक्केच वीज भरावी लागणार आहे, असे ‘महावितरण’च्या वतीने सांगण्यात आले.

कृषीपंपासाठी सुरुवातीला ७ हजारांचे कोटेशन भरावे लागते. त्यानंतर ‘महावितरण’च्या कार्यालयाकडे याचा अहवाल दिला जातो. कृषीपंपासाठी लगेच वीज मिळत नाही. यासाठी दीड-दोन वर्षे तरी लागतात. त्यानंतर लाईनमन येऊन सदरील जागेची व कोटेशन पडताळणी करतो. त्यानंतर लाईनमेनने दिलेला अहवाल हा वरिष्ठांकडे सादर केला जातो तेव्हा कुठे तो अहवाल मिळाल्यानंतर वरिष्ठ संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर जावून वीजपुरवठा केला जातो. परंतु, हे सर्व सोपस्कार झाल्यानंतही मात्र संंबंधित शेतकऱ्यांंना वेळेच्यावेळी बिल न देता वसुली केली जाते. काही शेतकरी संंबंधित कार्यालयात जावून ‘आमचे किती बिल आहे’ याची विचारणा करतो. हे असे का व्हावे? याबाबत ‘महावितरण’च्या वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे, पण कोणीही लक्ष देत नाही. बिले न देताच वसुली मात्र केली जात आहे, असे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रतिक्रिया

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ७५ हजार ३१८ कृषीपंपचालक आजघडीला आहेत. ‘महावितरण’ची वीजबिल थकबाकी ११५० कोटी ४३ लाख रुपये बाकी आहे. यापैकी ६ कोटी ६९ लाख रुपये आजपर्यंत वसूल केले आहेत. ज्या कृषीपंपचालकांना विजेचे बिल मिळाले नसले तरी त्यांना पैसे भरल्याची रितसर पावती दिली जाते. ज्या कृषीपंपचालकांकडे ‘महावितरण’ची बाकी आहे त्यांनी वेळेत भरणा केल्यास त्याचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही.

-सुधाकर जाधव, अधीक्षक अभियंता, महावितरण, हिंगोली