शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

जवळा पांचाळ परिसरात हरभरा पिकाचे उत्पादन घटले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST

जवळा पांचाळ परिसरातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु हरभरा पिकाने शेतकऱ्यांना साथ दिली नसल्याचे ...

जवळा पांचाळ परिसरातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. परंतु हरभरा पिकाने शेतकऱ्यांना साथ दिली नसल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहेे. तसेच यावर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन मूग, उडीद व तूर या खरीप पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पाण्याचा निचरा झाला नसल्याने रब्बी पिकांची पेरणी लांबणीवर गेली होती. अतिवृष्टीमुळे रब्बी पिकांच्या पेरणीला उशीर झाल्याने पिकांना हवी तेवढी थंडी व पोषक वातावरण मिळाले नसल्याने रब्बी पिकांच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्याचबरोबर वारंवार ढगाळ वातावरण होत असल्याने फवारणी खर्च वाढला गेला होता. हरभरा काढण्यासाठी आल्याने जवळपास २,५०० रुपये प्रति बॅग प्रमाणे कापण्यात आले व मळणी यंत्रद्वारे काढण्यासाठी २२० रुपये प्रतिक्विंटल दराने काढण्यात आले. शेतकऱ्यांना एका एकरामध्ये तीन ते पाच क्विंटल प्रमाणे उत्पन्न निघत आहे. उत्पन्न कमी निघत असल्याने मळणी यंत्र मालकाला काहीच परवडत नसल्याचे सांगितले. म्हणून त्यांनी सुद्धा भावांमध्ये वाढ केली असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी रब्बी पिकाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली असून शेतकरी वर्ग पुन्हा एकदा उत्पन्नाच्या कचाट्यात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांचा लागवडी खर्चही निघाला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.