'यूपीएससी'त यश मिळविलेल्या विद्यार्थ्याची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST2021-09-27T04:32:06+5:302021-09-27T04:32:06+5:30

हिंगोली : यूपीएससी परीक्षेत २१ व्या वर्षीच यश मिळविलेल्या वैभव बांगर या विद्यार्थ्याला खांद्यावर घेऊन खासदार हेमंत पाटील व ...

Procession of students who have achieved success in 'UPSC' | 'यूपीएससी'त यश मिळविलेल्या विद्यार्थ्याची मिरवणूक

'यूपीएससी'त यश मिळविलेल्या विद्यार्थ्याची मिरवणूक

हिंगोली : यूपीएससी परीक्षेत २१ व्या वर्षीच यश मिळविलेल्या वैभव बांगर या विद्यार्थ्याला खांद्यावर घेऊन खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर यांनी मिरवणूक काढून जल्लोष केला. हिंगोली येथे २६ सप्टेंबर रोजी त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. यामध्ये हिंगोलीतील वैभव बांगर या विद्यार्थ्याने २१ व्या वर्षीच बाजी मारली. ताे आमदार संतोष बांगर यांचे बंधू व नगर परिषद सदस्य सुभाषराव बांगर यांचा मुलगा आहे. त्यांच्या यशाने हिंगोलीकरांची मान उंचावली आहे. याबद्दल त्याच्या नागरी सत्काराचे आयोजन रविवारी केले होते. यावेळी खासदार हेमंत पाटील व आमदार संतोष बांगर यांनी वैभवला चक्क खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढली. हिंगोली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास शिवसेनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Procession of students who have achieved success in 'UPSC'